एक्स्प्लोर
Pune News : निजामुद्द्दीन-गोवा एक्सप्रेसला जेजुरीत थांबा, भंडारा उधळून ग्रामस्थांकडून स्वागत
जेजुरी : निजामुद्द्दीन-गोवा एक्सप्रेसचं जेजुरीत भंडारा उधळून मार्तंड देवस्थान आणि ग्रामस्थांनी स्वागत केलं.
Goa Nizamuddin Express
1/9

बहुजनांचा देव असलेल्या जेजुरी खंडोबा नगरीत भविक ग्रामस्थ देवस्थानच्या मागणी वरून लांब पल्याच्या निजामुद्द्दीन-गोवा या रेल्वेगाडीला आजपासून जेजुरीत थांबा मिळाला आहे.
2/9

जेजुरी रेल्वे स्थानकात गाडी थांबताच भंडारा उधळून संबळ वाजवत स्वागत करण्यात आले आहे.
3/9

श्री मार्तंड देवस्थान आणि जेजुरी गावकरी, मानकरी, खान्देकरी तसेच रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
4/9

रेल्वे थांबल्याचा आनंद व्यक्त करत लाडू वाटपही करण्यात आले.
5/9

जेजुरी नगरी ही तीर्थक्षेत्र पर्यटन आणि ओद्योगिक नगरी असल्यामुळे देशभरातील विविध राज्यातील लोक येत जेजुरीत येत असतात.
6/9

त्यामुळे जेजुरीत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा महत्वाचे होते.
7/9

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात वारंवार केंद्रीय रेल्वे प्रशासनाने कडे जेजुरीत रेल्वे थांबण्याची मागणी केली होती.
8/9

याची दखल घेत आजपासून निजामुद्द्दीन गोवा गाडीला थांबा देण्यात आला आहे.
9/9

उर्वरित एक्सस्प्रेस गाड्यांनाही जेजुरी थांब देण्याची मागणी भविक आणि पर्यटकांनी केली आहे.
Published at : 20 Aug 2023 05:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























