(Source: Poll of Polls)
Sooraj Pancholi Quits Bollywood: भाईजाननं लॉन्च केलेल्या हँडसम हंकचा बॉलिवूडला कायमचा अलविदा; सुपरस्टार वडिलांचा नाव न घेता कपूर कुटुंबीयांवर गंभीर आरोप
Sooraj Pancholi Quits Bollywood: वडिलांनी एक ट्वीट रिट्वीट केल्यामुळे ही बाब उघड झाली आणि त्यासोबत त्यांनी आणखी एक ट्वीट करत बॉलिवूडच्या प्रतिष्ठीत कपूर कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.

Sooraj Pancholi Quits Bollywood: बॉलिवूड (Bollywood News) जगं दिसतं तेवढं चमचमतं, ग्लॅमरस नाही, या प्रत्यय आजवर आपल्याला अनेक उदाहरणांमधून आलाय. अशातच आता, सलमान खाननं लॉन्च केलेल्या हँडसम हंकनं बॉलिवूडला कायमचं रामराम म्हटलं आहे. खरं तर, हा हँडसम हंक म्हणजे, बॉलिवूडच्या एका दिग्गज सुपरस्टारचा मुलगा. त्याला सलमान खाननं बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं, पण त्याचं नाणं इंडस्ट्रीत काही खणाणलं नाही. अशातच आता त्यानं बॉलिवूडमधून कायमची एग्झिट घेतली असून तो लवकरच स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे. वडिलांनी एक ट्वीट रिट्वीट केल्यामुळे ही बाब उघड झाली आणि त्यासोबत त्यांनी आणखी एक ट्वीट करत बॉलिवूडच्या प्रतिष्ठीत कपूर कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.
बॉलिवूडमधून एग्झिट घेणाऱ्या अभिनेत्याच्या सुपरस्टार वडिलांचा आरोप काय? (Aditya Pancholi On Anil Kapoor Boney Kapoor)
बॉलिवूड गाजवणाऱ्या सिनेमांची यादी काढली, तर या सिनेमाचं नाव वगळून चालणार नाही. 1988 सालचा हा सिनेमा, 'तेजाब'. अनिल कपूर, माधुरी दीक्षित स्टार या सिनेमानं धुवांधार कमाई केलेली. या सिनेमात अनिल कपूर, माधुरी दीक्षित यांच्यासोबतच चंकी पांडे, अन्नू कपूर, अनुपम खेर आणि किरण कुमार झळकले होते. तब्बल 50 आठवडे या सिनेमानं थिएटरमध्ये धुमाकूळ घातलेला. त्या काळातला 'गोल्डन जुबली'चा खिताबही या सिनेमानं पटकावलेला. त्यावेळी सिनेमाचं बजेट 3.25 कोटी रुपये होतं, तर जगभरात या सिनेमानं 16.35 कोटींची कमाई केलेली. या सिनेमाची कथा, गाणी आणि पात्र सर्वांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. पण, आता 37 वर्षांनंतर याच सिनेमाबाबत बॉलिवूडच्या एका अभिनेत्यानं अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
I was the original choice for Tezaab (1988), opposite @MadhuriDixit . Director N. Chandra, still very much around can confirm this.
— Aditya Pancholi (@AdityaRPancholi) October 27, 2025
Unfortunately, an actor, through his elder brother (who remains active in the industry), influenced the director to replace me. The rest, as they… pic.twitter.com/0GsBvsK2KG
1988 साली रिलीज झालेल्या 'तेजाब'ला 37 वर्ष पूर्ण झालीत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीनं या सिनेमावरुन कपूर कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदित्य पांचोलीनं दावा केलाय की, 'तेजाब'साठी पहिली पसंत अनिल कपूर नव्हते, तर त्याला ही फिल्म ऑफर झालेली. आदित्य पांचोलीनं आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलंय, काही सिनेमांमध्ये हिरो आणि काहींमध्ये त्यानं खलनायकाची भूमिका साकारलेली. अशातच आता त्यानं आपल्या ट्विटर हँडलवरुन 'तेजाब' सिनेमाबाबत एक क्रिप्टीक पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं म्हणणं आहे की, सर्वात आधी 'तेजाब'च्या लीड रोलसाठी त्याला निवडलं गेलं होतं. पण, नंतर बोनी कपूर यांच्या माध्यमातून अनिल कपूर यांना सिनेमात घेण्यात आलं.
आदित्य पांचोलीचा निशाणा बोनी कपूर, अनिल कपूर यांच्याकडे (Aditya Pancholi Allegation On Anil Kapoor Boney Kapoor)
आदित्य पांचोलीनं ट्विटरवर लिहिलंय की, "तेजाब' 1988 मध्ये आलेली, त्यासाठी मी माधुरी दीक्षितसोबत स्क्रिन शेअर करणार होतो... डायरेक्टर एन चंद्रा, जे आजही अॅक्टिव्ह आहेत, याची पुष्टी करू शकतील... पण, दुर्दैवानं एका अभिनेत्यानं आपल्या मोठ्या भावामार्फत (जो आधीपासूनच इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह होता) दिग्दर्शकाला मला रिप्लेस करण्यासाठी इन्फ्लुएंस केलं. बाकी ते नेहमीच म्हणतात की, सर्व इतिहास आहे..."
Sooraj Pancholi quits Bollywood. Sooraj has decided to not work in the Bollywood anymore, instead he is going to start his business soon. pic.twitter.com/0y7GP4LROt
— KRK (@kamaalrkhan) October 27, 2025
सूरज पांचोलीनं इंडस्ट्री सोडण्याचं कारण काय? (Why Sooraj Pancholi Quits Bollywood?)
आदित्य पांचोलीनं नाव न घेता, बोनी कपूर आणि त्यांचा लहान भाऊ अनिल कपूर यांचा उल्लेख केला आहे. याव्यतिरिक्त आदित्य पांचोलीनं KRKचं ट्वीटही रिपोस्ट केलंय की, ज्यामध्ये त्यानं सांगितलंय की, 'सूरज पांचोलीनं बॉलिवूड सोडलंय... सूरजनं आता ठरवलंय की, तो आता बॉलिवूडमध्ये काम करणार नाही... आता तो लवकरच स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे...' यावरुन स्पष्ट होतंय की, आता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला सलमान खाननं 'हिरो' सिनेमातून लॉन्च केलेलं. पण, तो पडद्यावर फारसा यशस्वी ठरला नाही. त्यामुळे आता त्यानं ग्लॅमरस जगाचा निरोप घेतलाय.



















