एक्स्प्लोर
Farmers Protest: 'एक मुलगा जनतेसाठी मेला तरी चालेल, बच्चू कडूंच्या भावाचं मोठं वक्तव्य
नागपुरात बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये (Farmers Protest) आता भावनिक आणि कौटुंबिक संघर्ष समोर आला आहे. 'आमच्या आईने सांगितलं होतं, सहा भावातला एक जनतेसाठी गेला तरी चालेल, पण जे करायचं आहे ते पूर्ण केल्याशिवाय परत यायचं नाही,' असे उद्गार बच्चू कडू यांचे मोठे बंधू बाळू कडू यांनी काढले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या (Loan Waiver) मागणीसाठी आक्रमक झाले असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा आणि रेल्वे ट्रॅकवर जाण्याचा इशारा दिला आहे. बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मुंबईला रवाना झाले असून, कर्जमाफीचा निर्णय घेऊनच परत यावे, अशी कुटुंबाची अपेक्षा आहे. या आंदोलनासाठी कुटुंबाने त्यांना सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त केले आहे, असेही त्यांच्या भावाने सांगितले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















