एक्स्प्लोर
FarmerProtest: 'कर्जमुक्तीची तारीख सांगितली नाही तर उद्या रेल्वे रोखू', Bachchu Kadu यांचा सरकारला थेट इशारा!
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीला त्यांनी तयारी दर्शवली असली तरी, आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. बच्चू कडू म्हणाले, 'आम्ही तिथे आल्यानंतर जर आंदोलकांना हात लागला, तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे.' आज संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून, मुख्य सचिवांसह ३० विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. असं असलं तरी, कर्जमुक्तीची निश्चित तारीख जाहीर न केल्यास उद्यापासून रेल्वे रोको करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. सध्या आंदोलक गांठा येथील महामार्गावरून परसोडीच्या मैदानावर स्थलांतरित झाल्याने वाहतूक कोंडी फुटली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















