एक्स्प्लोर
Pune News : तीन राज्यात भाजप विजयी; पुण्यात भाजपकडून विजयी जल्लोष
भारतीय जनता पार्टीने मध्यप्रदेश , राजस्थान, तसेच छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
pune news
1/8

भारतीय जनता पार्टीने मध्यप्रदेश , राजस्थान, तसेच छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्या नंतर भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्यावतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा केला.
2/8

मोठ्या मोठ्याने घोषणा देत त्यांनी पेढे वाचून आनंद साजरा केला.
3/8

पुण्यातील फर्ग्यूसन रस्त्यावरील कलाकार कट्ट्यासमोर सगळे भाजपचे कार्यकर्ते एकत्र आले होते.
4/8

यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.
5/8

पुण्यातील अनेक रस्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
6/8

यावेळी बोलताना घाटे म्हणाले ,' पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे . केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकार हे जनतेचे सरकार आहे तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी आहे'
7/8

यावेळी घाटे यांच्यासह पुणे भाजप प्रभारी माधवजी भांडारी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सचिव वर्षा डहाळे,युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे उपस्थित होते.
8/8

Pune
Published at : 03 Dec 2023 06:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























