एक्स्प्लोर

ITC : केंद्राच्या निर्णयाचा सलग दुसऱ्या दिवशी ITC ला फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात

ITC : केंद्रानं तंबाखूजन्य उत्पादनांवर  40 टक्के जीएसटी उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं आयटीसीला मोठा फटका बसला आहे. 

मुंबई : केंद्र सरकारनं तंबाखूजन्य उत्पादनांवर  40 टक्के जीएसटी आणि सुधारित उत्पादन शुल्क 1 फेब्रुवारीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं तंबाखूजन्य पदार्थ म्हणजेच तंबाखू, सिगारेट, बीडी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सलग दुसऱ्या दिवशी फटका बसला आहे. आयटीसीच्या शेअरमध्ये दोन दिवसात  14 टक्क्यांची घसरण झाली आहे. आयटीसीच्या शेअरनं तीन वर्षांचा नीचांक गाठला आहे.  दोन दिवसात आयटीसीच्या गुंतवणूकदारांचं 72300 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. यामुळं एलआयसीला देखील मोठा फटका बसला आहे. 

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आयटीसीमध्ये 15.86 टक्के गुंतवणूक आहे. एलआयसीकडे आयटीसीचे  1,98,58,07,233 शेअर सप्टेंबरपर्यंतच्या तिमाहीत होते. त्यानुसार एलआयसीचं 11460 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. एसबीआय म्युच्युअल फंडची देखील आयटीसीमध्ये मोठी गुंतवणूक आहे. आयटीसीत इतर म्युच्युअल फंडकडून देखील गुंतवणूक करण्यात आलेली आहे. आयटीसीची मालकी प्रमोटर्स किंवा प्रमोटर ग्रुपकडे नाही. यामुळं एलआयसी आणि इतर म्युच्युअल फंडचं मोठं नुकसान दोन दिवसात झालंय.     

आयटीसीचा स्टॉक 1 जानेवारी 2026 जवळपास  10 टक्क्यांनी घसरला होता. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 5 टक्क्यांनी घसरुन 345.25 रुपयांवर आला. 

ITC: आयटीसीचा स्टॉक का घसरला?

वित्त मंत्रालयानं बुधवारी तंबाखूजन्य उत्पादनांवर 40 टक्के जीएसटी लादण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय देखील करण्यात आला आहे. सिगारेटच्या लांबीनुसार 1000 स्टीकवरील उत्पादन शुल्क 2500-8500 रुपये करण्यात आलं आहे. या निर्णयामुळं शेअर बाजारात तंबाखू कंपन्यांच्या स्टॉकमध्ये घसरण झाली आहे. 

वित्त मंत्रालयानं करवाढीचा निर्णय घेतल्यानं सिगारेट उत्पादकांकडून दरवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जीएसटी 40 टक्के आकारण्याचा आणि उत्पादन शुल्क वाढीच्या निर्णयाच्या परिणामापासून वाचण्यासाठी सिगारेटचे दर 40 टक्क्यांनी वाढू शकतात, याचा परिणाम ग्राहकांवर होईल, असं मॉर्गन स्टॅनलीच्या विश्लेषकानं म्हटल्याचं रॉयटर्सनं म्हटलं आहे. 

केंद्र सरकारनं तंबाखूजन्य पदार्थांवर करवाढ लागू केली आहे ती 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यामुळं सिगारेट उत्पादक कंपन्या जानेवारी महिन्यात उत्पादन वाढवण्यावर भर देऊ शकतात. 

दुसरीकडे गॉडफ्रे फिलिप्स इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये आज 41.80 रुपयांची घसरण झाली आहे. तर, व्हीएसटी इंडस्ट्रीजचा शेअर देखील 4.45 रुपयांनी घसरला. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Embed widget