एक्स्प्लोर

मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

सोलापूर शहरात राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली असून बाळासाहेब सरवदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सोलापूर : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात (Solapur) राजकीय वादातून भाजपमधील (BJP) दोन गटात टोकाचा वाद झाल्याच चित्र पाहायला मिळालं. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चांगलाच राडा झाला. सोलापुरातील जोशी गल्ली परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय भाजपच्याच दुसऱ्या गटाने फोडले. आपल्या समर्थक उमेदवारास उमेदवारी न मिळाल्याच्या करणावरून दुसऱ्या गटाने कार्यालय फोडल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी, पोलिसांनी (Police) मोठा बंदोबस्त लावून हस्तक्षेप केला. मात्र, येथील राड्यातच एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर महापालिका परिसरातील घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. 

सोलापूर शहरात राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली असून बाळासाहेब सरवदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप केला जात असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. सोलापूर महापालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला. प्रभाग दोनमध्ये शालन शिंदे ह्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्याविरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात मोठा वाद झाला, या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले. मात्र, त्याचवेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ह्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणातील 4 संशयितांना सोलापुरातील जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. 

सोलापुरातील मनसेच्या नेत्याचा गंभीर आरोप 

दरम्यान, प्रभाग 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होता, त्यामुळे सरवदे कुटुंबावर भाजप नेत्यांकडून दबाव आणला जातं होता. समाजात वाद नको म्हणून ते सोडवायला मनसे नेते बाळासाहेब सरवदे गेले होते. त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला आहे. मनसेचे लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत इंगळे यांनी हा गंभीर आरोप केला आहे. 

हेही वाचा

आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
'भाजप जे देईल ते त्यांना घ्यावं लागतं' पदवीधर निवडणूकीवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी अन् शिंदेसेनेवर हल्लाबोल
'भाजप जे देईल ते त्यांना घ्यावं लागतं' पदवीधर निवडणूकीवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी अन् शिंदेसेनेवर हल्लाबोल
Embed widget