Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आज गंभीर राजकीय आरोप केला. कुलाब्यात बंडखोर उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावण्यात नार्वेकरांचा हात होता असा दावा त्यांनी केला. पराभव दिसत असल्याने राऊत बिनबुडाचे आरोप करतायत असं उत्तर नार्वेकरांनी दिली. आरोप प्रत्यारोप सुरुच राहतील पण विधानसभा अध्यक्षासारख्या महत्वाच्या पदावरील व्यक्तीने स्थानिक राजकारणापासून दूर राहायला हवं का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. पाहुयात हा रिपोर्ट
मुंबईच्या कुलाब्यातील वाॅर्ड क्रमांक २२६ सध्या चर्चेत आहे..
कारण तिथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर उभे आहेत, त्यांना भाजप बंडखोर अशोक पाटील यांनी आव्हान दिलं होतं
मात्र अशोक पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला..
त्यासाठी राहुल नार्वेकरांची शिष्टाई यशस्वी ठरल्याची चर्चा आहे..
आता मकरंद नार्वेकर यांच्या विरोधात एकमेव अपक्ष उमेदवाराचा अर्ज आहे
त्याला अर्ज मागे घ्यायला लावला तर मकरंद नार्वेकर मुंबईतून बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे
चर्चा या घडामोडींची कमी आणि यावरुन
ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची जास्त आहे.
विधानसभा अध्यक्ष धमक्या देतात असा थेट आणि गंभीर आरोप राऊतांनी केलाय
All Shows
































