एक्स्प्लोर
Palghar : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रस्त्याची चाळण, टोलवसुली करुनही रस्त्यांची दुरावस्था; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण
Mumbai-Ahmedabad Highway Pothole : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. येथे रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण झाली आहे.
Mumbai-Ahmedabad Highway Pothole
1/9

रस्त्यांवरील खड्ड्यांचा मोठा फटका येथील स्थानिक नागरिक तसेच वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
2/9

गुजरात सीमेपासून मुंबईपर्यंत चारोटी, खानिवडे आणि दहिसर अशा तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टोल वसुली केली जाते.
3/9

टोलवसुली केल्यानंतरही या महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल जात असल्याचं चित्र आहे.
4/9

महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेलं आहे. रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे् पडले आहेत.
5/9

देखभाल आणि दुरुस्तीचा ठेका असलेल्या कंपनीकडून खड्डे बुजवले जात नसल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
6/9

गुजरात सीमेपासून मुंबईच्या दहीसर टोल नाक्यापर्यंत आर. के. जैन या कंपनीला देखभाल दुरुस्तीचा ठेका दिला आहे.
7/9

आर. के. जैन या कंपनीला रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती तब्बल 26 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
8/9

मात्र तरीसुद्धा या कंपनीकडून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतलं जात नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुद्धा झोपेचं सोंग घेतलं आहे का? असा सवाल वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
9/9

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्यावरील खड्ड्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
Published at : 16 Jul 2023 10:02 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























