पालघर जिल्ह्याला झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात काही वेळातच पूरस्थिती निर्माण केली.
2/9
ठिकठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सकल भागामध्ये पाणी साचलं तर नदी नाल्यांनाही मोठा पूर आला
3/9
पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे 200 सेंटीमीटरने उघडण्यात आले
4/9
काही रस्त्यांवरील छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. तर काही गावांचा संपर्कही तुटला आहे.
5/9
धामणी आणि त्याच्या खाली असलेल्या कवडास धरणातून जवळपास 95 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर असून नदीकाठी असलेल्या जवळपास 40 च्या वर गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
6/9
मुसळधार पावसामुळे जव्हार मोखाडा विक्रमगड डहाणू तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरलं होतं
7/9
जिल्ह्यात जवळपास 70 टक्के भात रोपन्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु आज झालेल्या पावसामुळे या भात रोपन्या झाल्या होत्या त्याचं मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान झालं आहे.
8/9
काही गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचंही मोठ्या नुकसान झाला आहे
9/9
मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंं आहे.