एक्स्प्लोर
Surgana Akhati Gauri : पावसाळ्यापूर्वी बीज परीक्षण आणि शेती अवजारांचं पूजन, नाशकात आखाती गौरींचा उत्सव साजरा
Nashik : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील डांग सीमावर्ती भागात 'आखाती गौराई ' सण उत्साहात साजरा करण्यात आला. पावसाळ्यापूर्वी बीज परिक्षण आणि शेती औजारांचं पुजन करत नाशकात आखाती गैरींचा उत्सव साजरा
Akhati Gauri farmer festival
1/10

Nashik Akhati Gauri : नाशकातल्या आखाती गौरींचा उत्सव शेतकऱ्यांचा पारंपारिक उत्सव आहे. नाशकातल्या सुरगाण्यात आखाती गौराई साजरी करण्याची परंपरा आहे.
2/10

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील डांग सीमावर्ती भागात 'आखाती गौराई ' सण उत्साहात साजरा करण्यात आला.
3/10

'आखाती गौराई ' सणाच्या निमित्ताने बीज परीक्षण आणि शेती अवजारांचे पूजन करण्यात आले.
4/10

सात दिवस अगोदरच गौराई घातली जाते, सात दिवसानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते.
5/10

या काळात पाच धान्य, भात, नागली, मका, तूर, उडीद यासह विविध प्रकारचे धान्य टोपलीत माती भरुन पेरले जातात.
6/10

त्या टोपलीत उगवलेल्या धान्यांच्या रोपांना गौराई म्हणतात. या प्रथेनुसार बीज परीक्षण केले जाते.
7/10

सात दिवसानंतर पारंपरिक पद्धतीने संबळ, कहाळ्या या वाजंत्रीने जल्लोषात गौराईची मिरवणूक काढली जाते.
8/10

गौराईच्या निमित्ताने पावसाळ्यापूर्वी आपल्याकडे उपलब्ध बियाणे कसे रुजणार याचा अंदाज घेतला जातो आणि गौराईचं विसर्जन करतात.
9/10

गौराईंच्या या संपूर्ण प्रक्रियेनंतर गौराई विसर्जन करतात. याच वेळी मिरवणूक काढण्यात येते.
10/10

सध्या सुरगाण्यात गौराईंचा उत्साह धूमधडाक्यात सुरु आहे.
Published at : 25 Apr 2023 10:57 AM (IST)
आणखी पाहा























