एक्स्प्लोर
PHOTO : दैवाने हिरावले दोन्ही हात, पायांना दिले बळ; नंदुरबारच्या गणेशची संघर्षगाथा
जन्मापासूनच दोन्ही हात नाहीत. तरी शिक्षणासाठीची इच्छा, जिद्द कमी झालेली नाही.नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद या छोट्याशा गावातील गणेश माळीची ही संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Nandurbar Ganesh Mali
1/9

घरात अठरा विश्व दारिद्रय, परिस्थिती चारही बाजूंनी प्रतिकूलच! मात्र, खचून न जाता आणि परिस्थितीचा बाऊ न करता धैर्याने आणि जिद्दीने आता शिक्षण घ्यायचे आणि वडिलांच्या छायेत ध्येय गाठायचे असा निर्धार केलाय आठ वर्षाच्या दोन्ही हातांनी दिव्यांग असलेल्या गणेशने.
2/9

हात नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा गणेश पायाने अक्षरे गिरवत असून इतर मुलांसारखेच तो शिक्षण घेत आहे. शिक्षणासाठी असलेली त्याची धडपड आणि जिद्द पाहून अनेकजण अचंबित होत आहेत.
3/9

नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद या छोट्याशा गावातील गणेशची ही संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
4/9

अत्यंत निरागस आणि पाहिल्यासोबत मोहित करणारा आठ वर्षांचा गणेश माळी हा जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकतो
5/9

जन्मापासूनच त्याचे दोन्ही हात नाहीत. तरी त्याची शिक्षणासाठीची इच्छा, जिद्द कमी झालेली नाही. त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी वडीलच सांभाळत आहेत.
6/9

गणेशला हात नसल्याने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तो पायाने अक्षर गिरवत आहे. पायानेच तो मोबाईल फोनदेखील सहजरित्या हाताळतो.
7/9

वडील मोलमजुरी करुन कसाबसा कुटुंबाचा गुजराण करत असल्याने आजी आजोबांच्या देखरेखीखाली राहतो. गणेशला शासन स्तरावरुनच कृत्रिम अवयवांसाठी आणि त्यांच्या जीवनाच्या लढाईसाठी मदतीची अपेक्षा अनेकांकडून करण्यात येत आहे.
8/9

हात नसल्याने जेवण सुद्धा पायाने चमचाच्या सहाय्याने करतो. त्याच्या या संघर्षाची अनुभूती त्याच्या प्रत्येक क्रियेप्रसंगी येते. वर्गातील अन्य मित्रही त्याच्या दिनचर्येसाठी त्याला मदत करतातच.
9/9

असलोद ग्रामस्थांनी राज्यातील सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांकडे गणेशाच्या समस्येबाबत पाठपुरावा केला आहे. यामुळे त्याला लवकरच कृत्रिम हात मिळतील अशी आशा आहे.
Published at : 27 Jan 2023 02:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























