एक्स्प्लोर
Sahastrakund Waterfall : नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित; नागरिकांची मोठी गर्दी, पाहा फोटो
Nanded Sahastrakund Waterfall : जून महिन्यात पावसाने (Rain) पाठ फिरवली आणि आता थेट जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडतांना पाहायला मिळत आहे.

Nanded Sahastrakund Waterfall overflowing
1/9

दरम्यान मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मागील आठवड्यात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झाल्याचे पाहायला मिळत आहे.
2/9

तर नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा देखील कोसळताना पाहायला मिळत आहे.
3/9

यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सहस्त्रकुंड धबधब्याचा प्रवाह सुरु झाल्याने हे पाहण्यासाठी नांदेडकर गर्दी करण्याची शक्यता आहे.
4/9

पावसाने दांडी मारल्याने नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाह सुरु झाला नव्हता. त्यामुळे पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली होती.
5/9

दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांत नांदेड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झाला आहे.
6/9

विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवरील हिमायतनगरपासून 15 किमी अंतरावर पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड बाणगंगा धबधबा शनिवारी दुपारपासून खळखळला आहे.
7/9

मागील वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात धबधबा सुरू झाला होता. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्याने पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
8/9

सध्या अंदाजे 100 ते 150 फुटावरून सहस्त्रकुंड धबधबा कोसळत असून, सहस्त्रकुंड धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
9/9

या व्यंगमदृश्याचा आनंद पर्यटक 80 फुट उंचीच्या मनोऱ्यावरून घेत आहेत. तर धबधब्याच्या काठावर पुरातन कालीन महादेव मंदिर असल्याने दर्शनासाठी ही भावीक येतात.
Published at : 10 Jul 2023 09:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
क्राईम
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
