एक्स्प्लोर
Nanded Rain Update : नांदेडच्या 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पाहा जिल्ह्यात कोठे काय परिस्थिती?
Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 327.2 मिलिमीटर पाऊस झाला असून, जिल्ह्यात 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
Nanded Rain Update
1/8

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाकी या गावचा नदीच्या पुलाच्या पाईपमध्ये कचरा व गाळ अडकल्यामुळे संपर्क काही काळ तुटला होता.
2/8

हा कचरा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबी साहाय्याने काढून रस्ता सुरळीतपणे चालू करण्यात आला.
3/8

धर्माबाद तालुक्यातील बनाळी या पूरग्रस्त गावाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली.
4/8

दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी नागरिकांच्या अडचणी समजून लोकांना धीर दिला.
5/8

हदगाव तालुक्यातील मौजे नेवरी येथील 21 घरांमध्ये पाणी जाऊन अन्नधान्याचे नुकसान झाले. संबंधित कुटुंबातील व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
6/8

हदगाव-उमरखेड मधील पैनगंगा नदीवरील पूल वाहतुकीसाठी सुरू असून वाहतूक सुरळीतपणे चालू आहे. पुराचे पाणी ओसरत आहे.
7/8

दरम्यान यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष हजर राहून पाहणी केली.
8/8

तर नांदेडच्या मुखेड तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव अतिवृष्टीमुळे फुटला. पाण्याचा विसर्ग हा संथ गतीने राहिल्यामुळे पाणी एकदम बाहेर निघाले नाही. यामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले
Published at : 22 Jul 2023 09:58 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























