एक्स्प्लोर
Chilli : नांदेडच्या मिरचीची 'लाली' कायम, परराज्यात मोठी मागणी
नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये (Dharmabad) रोज 500 थैल्या मिरचीची आवक होते. दरम्यान, सध्या मिरचीला चांगला भाव असल्यानं शेतकरी समाधानी आहेत.
maharashtra nanded Chilli
1/10

नांदेडच्या (Nanded) तिखट लाल मिरचीला (chīlli) पर राज्यातून मोठी मागणी आहे. अशातच यावर्षी मिरचीच्या उत्पादनात देखील वाढ झाली आहे.
2/10

सध्या मिरचीला दरही चांगली मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) फायदा होतोय.
3/10

नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये (Dharmabad) रोज 500 थैल्या मिरचीची आवक होते. दरम्यान, सध्या मिरचीला चांगला भाव असल्यानं शेतकरी समाधानी आहेत.
4/10

तेलंगणा, कर्नाटक राज्यातील व्यापारी नांदेडला येऊन मिरची खरेदी करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, बिलोली आणि धर्माबादमध्ये मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची लागवड केली जाते.
5/10

गावरान तिखट मिरचीला मोठी मागणी असते. ही मिरची पातळ, चवीला छान आणि पचायला चांगली असते. सेंद्रिय पद्धतीने मिरचीची लागवड केली जाते.
6/10

मिरचीला एक एकरचा खर्च वीस ते पंचवीस हजार इतका येतो. एकरात सरासरी चार ते पाच क्विंटल उत्पन्न होते. यावर्षी प्रतीक्विंटल तीस हजार भाव मिळत आहे.
7/10

मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील धर्माबादमध्ये यंदा पीक चांगले असल्याने आवक वाढली आहे.
8/10

सध्या मिरची बाहेर ठिकाणी पाठवण्यावर भर दिला जात असल्याने दर गतवर्षीचे कायम असल्याचे चित्र आहे. दर कमी होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली
9/10

धर्माबाद हे मिरची, हळद आणि धने पावडरच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी धर्माबादसह हैदराबाद, खम्मम, वरंगल, ब्याडगी (कर्नाटक), सोलापूर, गुलबर्गा या ठिकाणांवरुन मिरची विक्रीसाठी येते.
10/10

जानेवारीपासून लाल मिरची बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी मिरचीचे पीक चांगले आले आहे. धर्माबादमध्ये सध्या 400 ते 500 थैल्या रोज मिरची येत आहे.
Published at : 05 Mar 2023 07:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
