एक्स्प्लोर
Shivaji Maharaj Jayanti 2024: छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला महाल परिसर; हजारों विद्यार्थ्यांचे सामूहिक शिवस्तुती पठण
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य नागपूरातील महाल येथील शिवतीर्थ परीसारत हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामूहिक शिवस्तुती पठण कार्यक्रम संपन्न झाला.
( Image Source :Abp Reporter )
1/10

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे साऱ्यांनाच वेध लागले आहे.
2/10

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती येत्या 19 फेब्रुवारीला देशभर मोठ्या हर्ष-उल्हासात साजरी केली जाणार आहे.
3/10

19 फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्याने नागपुरात श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने हजारो शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक 'शिवस्तुती' गायली आहे.
4/10

नागपुरच्या महाल येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ येथे सुमारे दोन हजारांहूर आधिक शालेय विद्यार्थी या सामूहिक 'शिवस्तुती'कार्यक्रमाला उपस्थित होते.
5/10

विद्यार्थ्यांनी एकसाथ केलेल्या छत्रपतींच्या जयघोषाने अवघा महाल परिसर दुमदुमून गेला होता.
6/10

यावेळी संजय देशकर यांनी विद्यार्थ्यांना शिवस्तुती चे महत्व पटवून दिले. आणि त्यानंतर कार्यक्रमाला आलेल्या सर्व 2000 विद्यार्थ्यांनी सामूहिक शिवस्तुती म्हटली.
7/10

या उपक्रमात राजेंद्र हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, सी.पी अँड बेरार हायस्कूल, श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय , इत्यादी शाळा सहभागी झाल्या होत्या.
8/10

विद्यार्थीजीवनातच शिवचरित्राचे महत्व आणि आपला जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहाचाव हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
9/10

येत्या 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रामुख्याने भव्य रक्तदान शिबिराचे या परिसरात आयोजन करण्यात आले आहे.
10/10

तरी शहरातील सर्व नागरिकांनी आणि शिव भक्तांनी कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिरमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
Published at : 16 Feb 2024 03:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
जळगाव


















