एक्स्प्लोर
Nagpur Rain Update: नागपुरात पावसाची दाणादाण! जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, मुख्य रस्त्यांना अक्षरक्ष: नदीचे स्वरूप
Nagpur Rain Update: नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात पावसाची सततधार पाहायला मिळत आहे.
Nagpur Rain Update
1/8

Nagpur Rain Update: नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात पावसाची सततधार पाहायला मिळत आहे. अशातच काल (मंगळवार) सकाळी 8:30 ते रात्री 11:30 वाजता दरम्यान नागपुरात 77.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
2/8

नागपूरच्या रामनगर परिसरात हिल रोड ते पांढराबोडीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे. त्यामुळे सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्या नागपूरकरांना आज अनेक त्रासांना सामोरे जावं लागू शकते. हवामान विभागाने आज नागपूर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा महाविद्यालय तसेच कोचिंग सेंटरला सुट्टी जाहीर केली आहे.
3/8

पावसाने काल मध्यरात्री नंतर जोर धरला असून रात्री दीड वाजल्यापासून आतापर्यंत मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस नागपुरात होत आहे... त्यामुळे नागपूर आतील अनेक रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूरच्या रामनगर परिसरात हिल रोड ते पांढराबोडी कडे जाणारा रस्ता पूर्णपणे जन्म झाला आहे. त्यामुळे सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्या नागपूरकरांना आज अनेक त्रासांना सामोरे जावं लागू शकते.
4/8

हवामान विभागाने आज नागपूर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी शाळा महाविद्यालय तसेच कोचिंग सेंटरला सुट्टी जाहीर केली आहे.
5/8

नागपूरच्या काही रस्त्यांवर पाणी साचलं आहे, तर काही रस्त्यांवर अक्षरशः नदी सदृश्य पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. बाजीप्रभू नगरमध्ये अशाच पद्धतीने उंच भागातून सखलभागाकडे नदी स्वरूपात पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. आणि त्याचं कारण म्हणजे परिसरातील नाल्या आणि सीवर लाईनची अपेक्षेप्रमाणे स्वच्छता न झाल्यामुळे पाणी नाली आणि सिवर लाईनमध्ये जाण्याऐवजी रस्त्यावरून वाहते आहे.
6/8

दुसरीकडे नागपूरच्या विमानतळ परिसरातील डॉ.हेडगेवार चौकात 2 फुटापर्यंत पाणी साचलेय. त्यामुळे विमानतळाच्या आता व बाहेर जाणाऱ्या वाहनांना याचा फटका बसत आहे. नागपूर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मनीषनगर, नरेंद्रनगर, कॉटन मार्केट अंडरपास पाण्याखाली गेले आहे. कॉटन मार्केट अंडरपासपासमध्ये परिवहन विभागाची एक बस व एक मालवाहू वाहन अडकले आहे. पोलीस प्रशासन व नागपूर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत सुरक्षा कठडे न लावल्याने आम्ही वाहन अंडरपासमध्ये अडकल्याचे चालकांनी सांगितले.
7/8

दरम्यान, नागपूरच्या मानकापूर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी जवळच्या भागांमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास जवळून वाहणाऱ्या नाल्याचा पाणी वस्तीत शिरलंय आणि लोकांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी जमा झालं आहे. त्यामुळे लोकांच्या घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे.
8/8

नागपूरातील बेसा-पिपळा परिसर हा नव्याने घरांचे बांधकाम होत असलेला हा संपूर्ण परिसर आहे. त्यामुळे इमारती आणि निर्माण झालेल्या घरांच्यामध्ये अनेक रिकामे प्लॉट्स किंवा रिकामे लेआउट आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी जमा झाले आहे.
Published at : 09 Jul 2025 08:51 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























