BMC Ward Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?
BMC Election Ward Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी वॉर्डनिहाय आरक्षण जाही करण्यात आले. महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव आहेत. तुमच्या वॉर्डमध्ये काय झालं?

BMC Election Ward Reservation: मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली. सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतीचा आयोजन मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC Election 2025) बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा येथे या प्रक्रियेला सुरुवात झाली. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी ही सोडत काढण्यात आली. (BMC Election news in Marathi)
त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग हे महिला उमेदवारांसाठी आरक्षित असतील. तर अनुसुचित जातींसाठी एकूण 15 वॉर्ड राखीव असतील यामध्ये अनुसुचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी 8 वॉर्ड आरक्षित असतील. तर अनुसुचित जमातीसाठी दोन वॉर्ड राखीव असतील त्यापैकी एका ठिकाणी महिला उमेदवारासाठी आरक्षण असेल. तर ओबीसींसाठी मुंबईतील 61 वॉर्ड राखीव असतील, यामध्ये 31 महिला ओबीसी उमेदवारांची समावेश असेल. तर सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 61 वॉर्ड राखीव असतील, यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या 31 महिला उमेदवारांचा समावेश, असेल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. दिनांक 14 नोव्हेंबर ते गुरुवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
एकूण सदस्यसंख्या 227
महिलांसाठी राखीव 114
अनुसुचित जातींसाठी राखीव वॉर्ड- 15 महिला 8
अनुसुचित जमाती एकूण राखीव -2 महिला एक
ओबीसी राखीव 61 महिला 31
सर्वसाधारण वॉर्ड 149 महिला राखीव 74
Mumbai Election: मुंबई महापालिकेतील अनुसूचित जमाती करिता आरक्षित प्रभाग कोणते?
प्रभाग क्रमांक -५३
प्रभाग क्रमांक - १२१
Mumbai Ward: मुंबई महानगरपालिकेतील अनुसूचित जातीकरिता आरक्षित 15 वॉर्ड कोणते?
प्रभाग क्रमांक खालील प्रमाणे -(महिला आरक्षण धरून)
प्रभाग क्रमांक -२६
प्रभाग क्रमांक -९३
प्रभाग क्रमांक -१५१
प्रभाग क्रमांक -१८६
प्रभाग क्रमांक -१४६
प्रभाग क्रमांक -१५२
प्रभाग क्रमांक -१५५
प्रभाग क्रमांक -१४७
प्रभाग क्रमांक -१८९
प्रभाग क्रमांक -११८
प्रभाग क्रमांक -१८३
प्रभाग क्रमांक -२१५
प्रभाग क्रमांक -१४१
प्रभाग क्रमांक -१३३
प्रभाग क्रमांक -१४०
ओबीसी राखीव वॉर्ड (61 जागा)- 72,46,216, 32, 82, 85, 49,170, 19, 91, 6, ६९, १७६,१०,१९८, १९१ , १०८,२१९,१२९,११७,१७१,११३,७०,१०५,१२,१९५,५०,१३७,१,२२६,१३६,४,१८२,९५,२२२, ३३, १३८,२७,४५,१८७,८०,२२३,१५०
Mumbai Ward Woman Reservation: मुंबईतील कोणते वॉर्ड महिलांसाठी आरक्षित?
अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव वॉर्ड- 133, 183, 147,186,155,118,151,189
अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव वॉर्ड- 121
ओबीसी महिला राखीव वॉर्ड- 52, 46, 158, 150, 33, 6,12, 167, 117,108, 128, 80, 100, 19, 82, 49, 11,176, 216,191, 170,13, 105, 198, 72,153,129, 18,1,32,27
खुला सर्वसाधारण महिला राखीव वॉर्ड-2,8, 14,15,16,17,24,28,31, 37,38,39, 42,44,51,56,,61,64,66, 71,73,74, 77,78,79, 81,83,84, 88,94,96, 97,101,103, 110,112,114,115, 116,124, 126,127,131,132,134,139,142,143, 156,157,163,172,173,174, 175,177,179,180,184, 196,197,199,201,203,205,209,212,213,218, 220,224,227

Mumbai Election News: यंदा वॉर्ड आरक्षित झाल्याने कोणाला फटका बसणार?
१३३ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक परमेश्वर कदम शिंदे सेना
१८३ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक गंगा माने
१४७ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक अंजली नाईक (ओबीसी)
१८६ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक वसंत नकाशे (ठाकरे गट) ओबीसी सिट
१५५ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये - ठाकरे गट आधी ही SC
११८ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक उपेंद्र सावंत
१५१ - महिला वॉर्ड माजी नगरसेवक राजेश फुलवारिया
१८९ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक हर्षदा मोरे
२०८ - ओबीसी - माजी नगरसेवक रमाकांत रहाटे
७२ - ओबीसी - माजी नगरसेवक पंकज यादव (२०१७ - ओबीसी)
२१६ - ओबीसी -(२०१७- ओबीसी)
१७० - ओबीसी - माजी नगरसेवक कप्तान मलिक ( एनसीपी- AP)
१७६ - ओबीसी - माजी विरोधी पक्ष नेता - रवी राजा
१९१ - ओबीसी माजी नगरसेवक विशाखा राऊत
१०८ - ओबीसी - माजी नगरसेवक नील सोमय्या
११७ - ओबीसी - माजी नगरसेवक सुवर्णा कारंजे
१७१ - ओबीसी - माजी नगरसेवक सानवी तांडेल
१- ओबीसी - माजी नगरसेवक तेजस्विनी घोसाळकर
२२६ - ओबीसी - माजी नगरसेवक हर्षदा नार्वेकर
१८२ - ओबीसी - माजी नगरसेवक मिलिंद वैद्य ठाकरे गट
२०८ - ओबीसी - माजी नगरसेवक रमाकांत रहाटे
८७ - ओबीसी - माजी नगरसेवक - विश्वनाथ महाडेश्वर
१५३ - ओबीसी - माजी नगरसेवक अनिल पठाणकर
१९३ - ओबीसी - माजी नगरसेवक हेमांगी वरळीकर
आणखी वाचा























