Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Dharmendra Daughter Esha Deol Post: धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलनं सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांच्या मृत्यूच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

Dharmendra Daughter Esha Deol Post: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. अशातच त्यांच्या निधनाच्या अफवा सगळीकडे पसरल्या आहेत. अशातच सतत देओल कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स शेअर केले जात आहेत. अशातच आता पुन्हा एकदा धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन धर्मेंद्र यांचं निधन झालेलं नाही. त्यांच्या प्रकृतीती सुधारणा होतेय, अशी माहिती दिली आहे.
View this post on Instagram
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या आल्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. पण, या सर्व अफवा असल्याचं त्यांची लेक ईशा देओलनं स्पष्ट केलंय. धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिचे वडील बरे होत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. या पोस्टमुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच, ईशानं धर्मेंद्र यांच्या निधनाच्या सर्व अफवांचं खंडन केलं आहे.
ईशानं इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हटलंय?
ईशा इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय की, धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच, ईशानं लगेचच चुकीची माहिती दूर करण्यासाठी पोस्ट केली. तिनं लिहिलंय की, "माझे वडील स्थिर आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारतेय. आम्ही सर्वांना आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतोय. माझ्या वडिलांसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांबद्दल धन्यवाद..."
6 दशकांत 300 हून अधिक सिनेमे
धर्मेंद्र यांनी त्यांच्या 6 दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2012 मध्ये त्याला पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'फूल और पत्थर', 'सीता और गीता', 'शोले', 'धरमवीर', 'आंखे', 'राजा जानी',," 'गुलामी', 'प्रतिज्ञा', 'नये जमाना', ' बर्निंग ट्रेन' आणि 'यादों की बारात' यासह अनेक हिट चित्रपट दिले. या चित्रपटांनी त्यांना केवळ एक प्रमुख अभिनेता म्हणून स्थापित केलं नाही तर प्रेक्षकांवर कायमची छाप सोडली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























