एक्स्प्लोर
In Pics : मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्र्यांची 'उंची' अधिक; विधानभवनाबाहेरील कटआऊटमुळे रंगल्या चर्चा
Nagpur : विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच लावण्यात आलेल्या कटआऊटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कटआऊटची उंची अधिक असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विरुद्ध दिशेने बाटा शोरुमच्या बाजूला हे कटआऊट लावण्यात आले आहे.
1/10

विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं कटआऊट लावण्यात आलं आहे. या कटआऊटमुळे विधानभवन परिसरात वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. कारण या कटआऊटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कटआऊट तुलनेने कमी उंचीचा तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कटआऊट जास्त उंचीचा आहे.
2/10

या कटआऊटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआऊटचा आकार लहान आहे, मात्र त्याला बेस आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कटआऊटला सपोर्ट आणि उंची देण्यासाठी काही बांबू जोडण्यात आले आहेत. हा कटआऊट प्रशासनाकडून लावण्यात आला आहे की स्थानिक कार्यकर्त्यांकडून याची माहिती नाही, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआऊटच्या खाली श्रीकांत शिंदे आणि किरण पांडव यांची नावे आहेत. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत तर किरण पांडव हे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी आहेत. या कटआऊटला महापालिकेला परवानगी आहे का याची माहिती द्यायला पालिका अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली.
Published at : 28 Dec 2022 07:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
भंडारा
























