एक्स्प्लोर
लालबागच्या राजाची स्वारी निघाली, लालबाग नगरी भारावली; लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर
Lalbaugcha Raja 2023: लालबागच्या राजाचा विजय असो... लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. लालबागमध्ये भक्तांची अलोट गर्दी एकवटली आहे.

Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live
1/11

लालबाग मार्केटमधून लालबागच्या राजाची स्वारी विसर्जनासाठी मार्गस्थ झाली.
2/11

लालबागच्या राजाचा विजय असो... ही शान कुणाची... लालबागच्या राजाची.... अशा जयघोषात लालबागच्या राजाची स्वारी विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहे.
3/11

लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी लालबाग-परळमध्ये गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.
4/11

पारंपारिक कोळी नृत्य आणि कोंबडी बाजाच्या तालावर लालबाग मार्केटमधून लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली आहे.
5/11

लालबागचा राजा लालबाग मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारामधून बाहेर पडला आहे.
6/11

लालबागचा राजा आता लालबागला एक प्रदक्षिणा घालेल आणि तिथून पुढे श्रॉफ बिल्डिंगच्या दिशेनं मार्गस्थ होईल.
7/11

श्रॉफ बिल्डिंगच्या इथे राजा आल्यानंतर त्याच्यावर मानाची पुष्पवृष्टी केली जाईल.
8/11

मानाची पुष्पवृष्टी झाल्यानंतर लालबागचा राजा आर्थर रोडच्या दिशेनं मार्गस्थ होईल.
9/11

तिथून राजा भायखळ्याहून पुढे भेंडीबाजार, चिराबाजार, दोन टाकी कर दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवर पोहोचेल.
10/11

तब्बल 20 तासांहून अधिक काळ राजाची विसर्जन मिरवणूक चालते.
11/11

अखेर उद्या (शुक्रवारी) सकाळी राजाला भावपूर्ण निरोप दिला जातो.
Published at : 28 Sep 2023 01:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
