एक्स्प्लोर
SIP : 10000 रुपयांच्या एसआयपीनं 'या' म्युच्युअल फंडनं अनेकांना केलं कोट्याधीश, दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या
Mutual Fund SIP : म्युच्युअल फंडमधील इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करुन कोट्यधीश होता येतं. 10000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं तुम्ही कोट्यवधी रुपयांचा कॉर्पस तयार होईल.
10 हजार रुपयांच्या एसआयपीनं अनेक जण मालामाल
1/6

नोकरदारांच्या आवडीचा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून एसआयपीकडे पाहिलं जातं. दरमहा 10 हजार रुपयांच्या एसआयपीनं तुम्ही कोट्याधीश होऊ शकता. एसआयपीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणं आवश्यक आहे. याशिवाय गुंतवणुकीत शिस्त अपेक्षित आहे.
2/6

तज्ज्ञांच्या मतानुसार म्युच्युअल फंडमधील इक्विटी योजनेमध्ये दरमहा 8000 ते 10000 रुपयांच्या एसआयपीनं कोट्याधीश होता येऊ शकतं.
3/6

तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये दरमहा गुंतवणूक करावी लागेल.जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर कशा प्रकारे करु शकता जाणून घेऊयात.
4/6

एसबीआय लार्ज कॅप आणि मिड कॅप फंडनं अनेकांना कोट्यधीश केलं आहे. या फंडची सुरुवात 1993 मध्ये झाली होती. हा ओपन एंडेड इक्विटी फंड आहे. लार्ज कॅप आणि मिड कॅप या दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. या फंडनं आतापर्यंत 13.33 टक्के रिटर्न दिला आहे. या फंडमध्ये 35 टक्के गुंतवणूक लार्ज कॅप तर 35 टक्के मिडकॅपमध्ये करणं आवश्यक आहे. उर्वरित 30 टक्के रक्कम फंडला त्यांच्या हिशोबानं गुंतवणूक करण्याची मुभा आहे.
5/6

एखाद्या व्यक्तीनं 1993 ला एसबीआय लार्ज कॅप अँड स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक केली असती. 10 हजार रुपयांची एसआयपी सुरु केल्यानंतर त्यांना 32 वर्षांनी 6.75 कोटी रुपये जमा झालेत. ही रक्कम 15.71 टक्के परताव्यानं जमा झाली आहे. एसबीआय म्युच्युअल फंड देशातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी आहे. कंपनी 28681 कोटी रुपयांचं असेट मॅनेजमेंट करतात.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 11 Mar 2025 12:44 PM (IST)
आणखी पाहा























