एक्स्प्लोर
Weather Update: आज संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांत बरसणार कोसळधारा
Maharashtra Rain Update: मुंबई, ठाणे, पुण्याच्या घाट परिसरासह उत्तर महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Maharashtra Rain Update
1/8

पाऊस हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे आजपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांमध्ये देखील पाऊस वाढणार आहे.
2/8

आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.
3/8

अनेक ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
4/8

पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
5/8

उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह ठाणे, पालघर, मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
6/8

विदर्भातील वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
7/8

तर राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
8/8

पुढील 3 ते 4 दिवसांत काही ठिकाणी तीव्र स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Published at : 16 Sep 2023 07:09 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
विश्व


















