एक्स्प्लोर
Land Scam: 'अजित पवारांच्या सभा उधळून लावू', Parth Pawar वरील आरोपांवरून भीम आर्मीचा इशारा
पुण्यातील कोरेगाव येथील महार वतन जमीन खरेदी प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. भीम आर्मीने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून पार्थ पवार यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 'अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा महाराष्ट्रातील त्यांच्या सर्व राजकीय सभा उधळून लावू,' असा थेट इशारा भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी दिला आहे. या जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीने १८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, वाद वाढल्यानंतर हा जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















