एक्स्प्लोर
विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला चांदीने मढवण्याचे काम चालू, नांदेडच्या भक्ताच्या मदतीने कामाला सुरूवात
Vitthal Rukmini Pandharpur : विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दार चांदीने मढविण्याचे काम सुरू , नांदेड येथील भक्ताने अर्पण केले आहे....
Vitthal Rukmini | Pandharpur
1/11

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे.
2/11

या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता.
3/11

नांदेड येथील अरगुलकर परिवारातर्फे या दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे.
4/11

यासाठी 30 किलो चांदी लागणार असून याची किंमत सुमारे 30 लाख रूपये आहे.
5/11

अरगुलकर कुटुंबातील शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे.
6/11

अरगुलकर परिवार श्री विठ्ठल रूक्मिणीचे निस्सीम भक्त आहेत.
7/11

त्यानुसार मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे.
8/11

यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.
9/11

येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
10/11

सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार आहे.
11/11

त्याचप्रकारे मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.
Published at : 25 Dec 2024 03:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























