बरोबर 12 वाजता रुक्मिणी स्वयंवर विवाह मुहूर्त येईल आणि विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सव मूर्ती सजवलेल्या विवाह मंडपात आणल्या जातील आणि साधारण बारा वाजता या विवाहाला सुरुवात होईल. यानंतर लग्नाच्या भोजनावळी सुरू होतील.
3/8
यानंतर रुक्मिणी मातेकडून आलेला गुलाल देवाच्या अंगावर टाकला जाईल तर देवाकडचा गुलाल रुक्मिणी मातेच्या अंगावर टाकण्यात येईल.
4/8
पावणे अकरा वाजता देवाला पंचपक्वानाचा महानैवेद्य दाखवला जाईल. साडे अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणी या वधू वर यांना विवाहाचा पोशाख परिधान होईल.
5/8
आज सकाळी 10 वाजता भागवताचार्य अनुराधा शेटे या रुक्मिणी स्वयंवरची कथा सांगायला सुरुवात करतील.
6/8
साक्षात देवाचा विवाह असल्याने याला उपस्थित राहण्यासाठी शेकडोच्या संख्येने भाविक येत असतात मात्र कोरोनामुळे यंदा भाविक नसले तरी थेट स्वर्गातील देव या विवाहासाठी उपस्थित असल्याची फुल सजावट केली आहे.
7/8
आज वसंत पंचमी विठुरायाच्या विवाहाची तिथी. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे.
8/8
पंढरपूर : वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, तो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. आणि याच मुहूर्तावर साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत असतो.