एक्स्प्लोर
PHOTO: सोलापुरातल्या मराठा आक्रोश मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थिती, तगडा पोलिस बंदोबस्त, मोर्चा शांततेत
solapur maratha morcha (फोटो सौजन्य- चेतन लिगाडे)
1/8

मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज, 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले.(फोटो सौजन्य- चेतन लिगाडे)
2/8

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा निघाला. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
3/8

या मोर्चाच्या निमित्तानं शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात आली होती तर मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली होती. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. त्यानुसार आजचा मोर्चा निघाला. (फोटो सौजन्य- चेतन लिगाडे)
4/8

या मोर्चाला नरेंद्र पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य,आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते,आमदार राजेंद्र राऊत राजेंद्र मिरगणे, महापौर श्रीकांचना यन्नम, पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे,रणजितसिंह मोहिते पाटील,प्रशांत परिचारक,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते. (फोटो सौजन्य- चेतन लिगाडे)
5/8

कोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनाच्यावतीने या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली होती. सोलापूर शहरात नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसातर्फे करण्यात आले होते.(फोटो सौजन्य- चेतन लिगाडे)
6/8

दुसरीकडे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त शहर आणि ग्रामीण हद्दीत तैनात करण्यात आला होता. सोलापूर शहर आणि ग्रामीण मध्ये जवळपास 4 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (फोटो सौजन्य- चेतन लिगाडे)
7/8

शहरात येणारे सर्व प्रमुख मार्ग पोलिसांच्या वतीने सील करण्यात आले होते. मोर्चा ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आले होते.(फोटो सौजन्य- चेतन लिगाडे)
8/8

या बंदोबस्तामध्ये सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, एसआरपीएफच्या तुकड्या, होमगार्ड, सातारा, सांगली, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. (फोटो सौजन्य- चेतन लिगाडे)
Published at : 04 Jul 2021 04:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























