एक्स्प्लोर
PHOTO : भारत जोडो यात्रेत दाखल होताच राहुल गांधींनी आदित्य ठाकरेंची गळाभेट घेतली
शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्यासोबत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरेंची गळाभेट घेतली.
Aaditya Thackeray And Rahul Gandhi
1/10

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्यासोबत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले.
2/10

आदित्य ठाकरे यांच्यासोबत सोबत शिवसेना नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्यासह इतर अनेक सहकारी आणि शिवसैनिक यात्रेत सहभागी झाले होते.
3/10

आदित्य ठाकरे यांनी हिंगोली येथे आज राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली.
4/10

संविधान आणि लोकशाहीसाठी आम्ही लढत आहोत असे सांगत आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेतून भाजवर हल्लाबोल केलाय.
5/10

यात्रे दरम्यान, राहुल गांधी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर हात टाकून चालत होते.
6/10

आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होताच राहुल गांधी यांनी त्यांची गळाभेट घेतली.
7/10

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणत शिवसैनिक देखील सहभागी झाले होते.
8/10

राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनी यात्रेदरम्यान खूप वेळ एकमेकांसोबत संवाद साधला.
9/10

काँग्रेसची भारत जोडी यात्रा तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झाली.
10/10

तामिळनाडूनंतर ही पदयात्रा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रात पोहोचली आहे. ही यात्रा राज्यातील 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. यादरम्यान 382 किमी अंतरचा प्रवास होईल.
Published at : 11 Nov 2022 11:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























