एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Samruddhi Mahamarg: समुद्धीचा सुसाट महामार्ग, देवेंद्र फडणवीसांनी पाच तासांत पार केलं 530 किमी अंतर
Maharashtra Samruddhi Mahamarg: नागपूर ते शिर्डी हे जवळपास 529 किमीचं अंतर त्यांनी अवघ्या पावणे पाच तासात पार केले.
![Maharashtra Samruddhi Mahamarg: नागपूर ते शिर्डी हे जवळपास 529 किमीचं अंतर त्यांनी अवघ्या पावणे पाच तासात पार केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/698b95ac277b35b427b260d8bd0b12801670176034293265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Samruddhi Mahamarg
1/11
![आज मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्री नागपूर ते शिर्डीदरम्यान समृद्धी महामार्गाची पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/82864eb7a5a4c7498dc569a0566173642d6ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्री नागपूर ते शिर्डीदरम्यान समृद्धी महामार्गाची पाहणी केली.
2/11
![11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणारेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/79246d55e9a10818cd38ebbdefbec545efc8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणारेय.
3/11
![Maharashtra Samruddhi Mahamarg: नागपूर ते शिर्डी हे जवळपास 530 किमीचं अंतर त्यांनी अवघ्या पावणे पाच तासात पार केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/4d319fa9fc4c97c1d4e4e70dfb746c17ab31b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Maharashtra Samruddhi Mahamarg: नागपूर ते शिर्डी हे जवळपास 530 किमीचं अंतर त्यांनी अवघ्या पावणे पाच तासात पार केले.
4/11
![‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते येत्या 11 डिसेंबरला होणार आहे . या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर ते शिर्डी असा प्रत्यक्ष प्रवास करून महामार्गाची पाहणी केली. या दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः वाहनाचे सारथ्य केले. महामार्गाच्या विविध टप्प्यांवर लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/a4eddbdd194ae3b4ae4c3c361c6320a249f1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते येत्या 11 डिसेंबरला होणार आहे . या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर ते शिर्डी असा प्रत्यक्ष प्रवास करून महामार्गाची पाहणी केली. या दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः वाहनाचे सारथ्य केले. महामार्गाच्या विविध टप्प्यांवर लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
5/11
![‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागपूर येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉईंट येथून आज दुपारी आपला प्रत्यक्ष पाहणी दौरा सुरू केला. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवत होते. तर मुख्यमंत्री त्यांच्या सोबत होते. त्यांच्या समवेत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, पायाभूत सुविधा प्रकल्प कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/3bf7308e982d4eafcc2980c90c7e3f60b0223.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागपूर येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉईंट येथून आज दुपारी आपला प्रत्यक्ष पाहणी दौरा सुरू केला. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवत होते. तर मुख्यमंत्री त्यांच्या सोबत होते. त्यांच्या समवेत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, पायाभूत सुविधा प्रकल्प कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते.
6/11
![जालना जिल्ह्यातील जालना व बदनापूर तालुक्यातील 25 गावांतून 42 किलोमीटरचा महामार्ग जात आहे. आज दुपारी महामार्गावरील जालना तालुक्यातील जामवाडी येथे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/3de82efb027cfe219eff00aa0fba86d39a2f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जालना जिल्ह्यातील जालना व बदनापूर तालुक्यातील 25 गावांतून 42 किलोमीटरचा महामार्ग जात आहे. आज दुपारी महामार्गावरील जालना तालुक्यातील जामवाडी येथे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
7/11
![उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गावर गाडी चालवली, जवळपास 150 किमी वेगाने फडणवीस यांनी महामार्गावर गाडी चालवली. नागपूर ते शिर्डी हे जवळपास 529 किमीचं अंतर त्यांनी अवघ्या पावणे पाच तासात पार केले. नागपूरहून शिर्डीच्या दिशेने मुख्यमंत्र्यांचा ताफा साडेबारा वाजताच्या आसपास निघाला होता. सायंकाळी पाच ते सव्वापाच वाजताच्या आसपास उपमुख्यमंत्री-मुख्यमंत्र्यांचा ताफा शिर्डीमध्ये पोहचला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/c03b14cfa2407163e86b6463120fa61b0d5a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गावर गाडी चालवली, जवळपास 150 किमी वेगाने फडणवीस यांनी महामार्गावर गाडी चालवली. नागपूर ते शिर्डी हे जवळपास 529 किमीचं अंतर त्यांनी अवघ्या पावणे पाच तासात पार केले. नागपूरहून शिर्डीच्या दिशेने मुख्यमंत्र्यांचा ताफा साडेबारा वाजताच्या आसपास निघाला होता. सायंकाळी पाच ते सव्वापाच वाजताच्या आसपास उपमुख्यमंत्री-मुख्यमंत्र्यांचा ताफा शिर्डीमध्ये पोहचला.
8/11
![पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/eac5d23500b442fb7f127e60cc8a8e98e0d8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
9/11
![त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर 'टेस्ट राईड' घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/43be4d9e172914f6eb91ef8d46a1fe3b95592.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर 'टेस्ट राईड' घेतली.
10/11
![नागपूरहून शिर्डीला टेस्ट ड्राईव्ह करताना त्यांचा ताफा वाशिममध्ये वारंगी कँपला जेवणासाठी थांबला होता. त्याशिवाय काही ठिकाणी सत्कारासाठीही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री थांबले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/8f55c809f598762200392e3fae3c7164c1a8b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागपूरहून शिर्डीला टेस्ट ड्राईव्ह करताना त्यांचा ताफा वाशिममध्ये वारंगी कँपला जेवणासाठी थांबला होता. त्याशिवाय काही ठिकाणी सत्कारासाठीही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री थांबले होते.
11/11
![समृद्धी महामार्गावरील जामवाडी (जि.जालना) येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,आ. नारायण कुचे,माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह जालना जिल्ह्यातील नागरिकांना भेटण्याची संधी मिळाली.काही क्षणांचा त्यांचा सहवास आमचा उत्साह वाढवणारा होता, असे फडणवीस म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/4a82f052195e30a5e18124dc00fbd807d5427.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समृद्धी महामार्गावरील जामवाडी (जि.जालना) येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,आ. नारायण कुचे,माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह जालना जिल्ह्यातील नागरिकांना भेटण्याची संधी मिळाली.काही क्षणांचा त्यांचा सहवास आमचा उत्साह वाढवणारा होता, असे फडणवीस म्हणाले.
Published at : 04 Dec 2022 11:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
फॅक्ट चेक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)