एक्स्प्लोर
PHOTO GALLERY : अवघी ३ फूट उंची, वडिलांचे छत्र हरवलेली अंकिता बनणार सर्वात कमी उंचीची महिला डॉक्टर!

Untitled_design
1/9

अवघी 3 फूट उंची असतानाही वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST) घवघवीत यश संपादन करणाऱ्या नांदेडची (Nanded) अंकिता बोडके (Ankita Bodke) ही विद्यार्थीनी सध्या चांगलीच चर्चेत आलीय.
2/9

म्हणतात ना.. की माणसाच्या शारिरीक उंची पेक्षा त्याच्या विचारांची आणि कर्तृत्वाची उंची महत्वाची असते, याच उक्तीप्रमाणे अंकिताने यशाला गवसणी घताली आहे.
3/9

अंकिता ही नांदेड शहरातील नमस्कार चौक विस्तारित नाथनगर येथील रहिवासी आहे. कोरोना काळात वडिलांचे छत्र हरवलेली अंकिता आपला भाऊ व आई सह येथे वास्तव्यास आहे.
4/9

घरी कर्ता पुरुष नसताना व वडिलांचे डोक्यावर छत्र नसताना आपल्या शारिरीक व्यंग्यत्वाला मात देऊन तीने नीट परीक्षेच्या (NEET Exam) हिमालयाची उंची गाठलीय असं म्हटलं तर वावग ठरवणार नाही.
5/9

स्वतःची उंची केवळ तीन फुटाची असताना हे शारीरिक व्यंग्यत्व बाजूला सारून व मोठ्या धैर्याने तिने नीट परीक्षेत 292 गुण प्राप्त केले आहेत. तर शारीरिक अपंगत्व कोट्यातुन तिने राज्यात सातवा क्रमांक पटकवला आहे.
6/9

अनेक जण आपल्या उंची अभावी हताश असतात, कमी उंची पाहुन लोक हसतात, लोकं आपणास काय म्हणतील या विवंचनेत राहत असतात. मात्र अंकिताने अशा गोष्टींना दूर ठेऊन व त्याकडे दुर्लक्ष करत सर्वात कमी उंचीची महिला डॉक्टर (lady doctor) बनण्याचा निश्चय केलाय.
7/9

अंकिता हिला MBBS शिक्षनासाठी मुंबई येथील KEM हॉस्पिटल मध्ये प्रवेश मिळाला आहे. दोन वर्षा पूर्वी अंकिता हिच्या वडिलांचे निधन झाले होते. तरी देखील न खचून जाता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने ध्येय सुरुच ठेवले.
8/9

अंकिता ने चित्रकला, नृत्यकलेतही निपुणता दाखवली आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
9/9

एमबीबीएस नतंर कार्डियोलोजिस्ट होण्याचे तिचे स्वप्न आहे. त्यामुळे ध्येय पूर्ण करण्यासाठी केवळ मेहनतीचीच गरज असते, हे मी करून दाखवेनच असा दृढविश्वास अंकिताने दाखवलाय.
Published at : 14 Feb 2022 01:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
