एक्स्प्लोर
Rain : राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra weather
1/9

सध्या राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिली आहे. परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. मात्र, अद्यापही शेतकरी (Farmers) पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
2/9

शेती पिकांसाठी पावसाची गरज असतानाही पावसानं दडी मारली आहे. यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
3/9

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
4/9

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5/9

छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
6/9

दरम्यान, पुढच्या तीन दिवसानंतर मात्र राज्यात उन्हाचा चटका वाढू शकतो. 18 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यात ढगाळ वातावरण निवळून ऑक्टोबर हिटचा परिणाम पूर्ववत जाणवू लागेल अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली
7/9

यावर्षीचा ऑक्टोबर हिट महाराष्ट्रात अधिक दाहक जाणवण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान 2 डिग्रीने तर पहाटेचे किमान तापमान 3 ते 4 डिग्रीने अधिक असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
8/9

कोकण आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचा परिणाम अधिक असण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
9/9

देशातून पूर्णपणे परतलेला नसून त्याला निरोप देण्यासाठी अजुनही वाट पहावी लागेल, अशी माहिती खुळे यांनी सांगितली.
Published at : 15 Oct 2023 07:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
