अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं काल निधन झालं.
2/5
वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
3/5
देशभरातून त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी त्यांना अनोख्या पध्दतीने श्रद्धांजली वाहिली आहे.
4/5
सिंधुताई सपकाळ यांचं स्टोन आर्ट साकारून सुमन दाभोलकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
5/5
दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्यावर पेंटिंग करत सुमन दाभोलकर यांनी सिंधुताई सपकाळ यांचं स्टोन आर्ट साकारलं आहे.