एक्स्प्लोर
Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Maharashtra Rain
1/9

राज्यातील काही भागात पावसानं हाहाकार घातला आहे. अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
2/9

नदी नाले दुथढी भरुन वाहत आहेत. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होत आहे.
3/9

विदर्भातील काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. तर काही भागात शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
4/9

मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत असल्याचं चिक्र दिसत आहे.
5/9

हवामान विभागानं दिल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
6/9

पावसामुळं जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. तर काही भागात शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
7/9

आज कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पालघर आणि ठाण्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
8/9

यवतमाळच्या महागाव तालुक्यात आजपर्यंत असा पाऊस कधीच बरसला नाही. पैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळं अनंतवाडी गावाला पुराचा वेढा पडला आहे.
9/9

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
Published at : 23 Jul 2023 09:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
