एक्स्प्लोर

दोन पवार... वार-पलटवार; अजित पवारांचा थोरल्या पवारांवर निशाणा, शरद पवार म्हणतात...

Maharashtra NCP Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर सगळी समीकरणं बदलली. अशातच, बुधवारी (5 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची बैठक बोलावण्यात आली होती.

Maharashtra NCP Political Crisis

1/7
या बैठकीत शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघांकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. तसेच, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं छायाचित्र लावण्यात आलं होतं. यावर थोरल्या पवारांनी आक्षेप घेतला आहे.

2/7
जे लोक माझा फोटो वापरतात त्यांना माहिती आहे त्यांचं नाणं चालणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी जोरदार टोला लगावला. भाजपकडे गेलेल्या अजित पवारांवरही शरद पवारांनी टिकास्त्र डागलं. काही दिवसांपूर्वीच पीएम मोदींनी राष्ट्रवादीला भ्रष्ट पक्ष म्हटलं होतं, मग आता कसं चालतंय? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.

3/7
तसेच, अजित पवार गटाच्या वतीनं राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हावर दावा करण्यात आला आहे. याबाबत बोलताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले की, पक्षाचं निवडणूक चिन्ह कुणालाही काढून घेऊ देणार नाही. ते म्हणाले, आज आपण सत्तेत नसलो तरी जनतेच्या हृदयात आहोत.

4/7
काल झालेल्या या घटनाक्रमात बंडखोर गटानं शरद पवारांना राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरुन हटवून त्याऐवजी अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष नेमलं आहे. निवडणूक आयोगाला लिहण्यात आलेल्या पत्रातही बंडखोर गटाकडून त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

5/7
अजित पवारांनी कालच्या बैठकीत बोलताना थोरल्या पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की,
अजित पवारांनी कालच्या बैठकीत बोलताना थोरल्या पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "शरद पवार आजही माझे आदर्श आहेत. मात्र माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो, मात्र माणसानं कधीतरी थांबावं... तरूणांना संधी कधी देणार? तुम्ही आशीर्वाद द्या ना, मार्गदर्शन करा, चुकलं तर तुम्ही आम्हाला दुरूस्त करा, कान धरा..."
6/7
अजित पवारांचा दावा आहे की, त्यांच्याकडे 53 पैकी 31 आमदारांचं समर्थन आहे. तर शरद पवार गटाकडे 16 आमदार, एक अपक्ष आमदार, 3 एमएलसी आणि 6 खासदारांचं समर्थन आहे.

7/7
अजित पवार शरद पवारांबद्दल म्हणाले,
अजित पवार शरद पवारांबद्दल म्हणाले, "तुम्ही मला सर्वांसमोर खलनायक दाखवताय, पण मला त्यांच्याबद्दल (शरद पवार) खूप आदर आहे. तुम्ही सांगा की, आयएएस अधिकारी वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होतात. भाजपचे नेतेही 75 व्या वर्षी निवृत्त होतात. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या उदाहरणावरून तुम्ही हे समजू शकता... मग तुम्ही कधी थांबणार आहात की, नाही?"

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात

नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी

राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना

Embed widget