एक्स्प्लोर
Independence Day : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील सरकारी इमारती, धरणांवर तिरंगा विद्युत रोषणाई; पाहा फोटो
Independence Day Celebration : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईसह राज्यातील प्रमुख कार्यालये, धरणांवर आकर्षक तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे.

Independence Day : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील सरकारी इमारती, धरणांवर तिरंगा विद्युत रोषणाई; पाहा फोटो
1/11

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याशिवाय, या इमारतीवर महापुरुषांच्या प्रतिमा दाखवल्या जात असल्याने डोळ्याचं पारणं फेडलं गेलं.
2/11

तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला 'तिरंगा'ची विद्युत रोषणाई पवना धरणाच्या सांडव्याला करण्यात आली आहे.
3/11

संपूर्ण मावळसह पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात आले आहे.
4/11

मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली.
5/11

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
6/11

तिरंग्याच्या रंगात आकर्षक विद्युत रोषणाईत तिलारी धरणाचा परिसर उजळून गेला आहे.
7/11

राज्यातील महत्त्वाचे धरण असलेल्या कोयना धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
8/11

डोळ्याचे पारणं फेडणारी ही दृष्ये आहेत.
9/11

अकोला शहराचं वैभव आणि ओळख असलेलं 'सुंदराबाई खंडेलवाल टॉवर' तिरंगाच्या रंगात न्हाऊन निघालंय. महापालिकेने ही रोषणाई केली आहे.
10/11

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील बारवी धरणावर तिरंगी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. बारवी धरणाचे अकरा स्वयंचलित दरवाजे असून या अकराही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग होत असून आकर्षक दृष्य दिसत आहे.
11/11

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकाची मुख्य इमारत राजीव गांधी भवनला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईने महापालिकाची इमारत उजळून निघाली.
Published at : 14 Aug 2023 10:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion