एक्स्प्लोर
Vidarbha Ganeshotsav 2022 : विदर्भातील नेत्यांच्या घरी बाप्पांचे आगमन...
नागपूरः नागरिकांसोबतच विदर्भातील नेत्यांच्या निवासस्थानीही गणेश स्थापना करण्यात आली. राजकीय मंडळीने सहकुटुंब गणरायाची पुजा करुन नागरिकांच्या सुख-समृद्धी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन.
1/6

Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन. मुहूर्ताच्या वेळी सकाळी नितीन गडकरी नागपुरात नसल्याने सारंग गडकरी यांच्याहस्ते गणेशस्थापना करण्यात आली. नंतर दुपारी गडकरी यांनी गणरायाचे दर्शन घेतले.
2/6

Nagpur : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपुरातील निवासस्थानी गणेशस्थापना करण्यात आली.
3/6

Akola : आमदार अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील न्यू तोष्णीवाल ले-आऊट येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन. बळीराजाला समृद्ध करण्यासाठी आमदार मिटकरींचं गणरायाला साकडं.
4/6

Nagpur : रामटेकचे शिवसेना खासदार कृपालजी तुमाने यांच्या सुभेदार ले-आऊट, मानेवाडा रोड, नागपूर येथील निवासस्थानी आज सकाळी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. खासदार तुमाने यांनी पत्नी रेवती यांच्यासह श्री गणेशाची पूजा व आरती केली.
5/6

Wardha : देवळी येथे वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले. विधीवत सहपरिवार गणरायांची स्थापना करून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुखी समाधानी ठेवावे अशी गणराया चरणी प्रार्थना केली.
6/6

Nagpur : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी बावनकुळे यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही सहकुटुंब गणेशस्थापना केली.
Published at : 31 Aug 2022 07:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
बातम्या
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
