एक्स्प्लोर
PHOTO : गडचिरोलीत कोसळधार! शेकडो गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला

Gadchiroli Rain Latest Update
1/10

राज्यात (Maharashtra Rain) गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरु आहे.
2/10

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे
3/10

प्राणहिता नदीची पाणीपातळी घटल्याने आलापल्ली- नागेपल्ली येथील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.
4/10

या महसुली मंडळात 2 दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने दोन्ही गावात प्राणहिता नदीच्या पुराचे पाणी शिरले होते
5/10

सद्यस्थितीत आलापल्ली-भामरागड मार्ग पर्लकोटा नदीला उफान आल्यानं बंद झाला आहे.
6/10

यामुळे तालुक्यातील 130 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे.
7/10

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील मेडीगट्टा येथील महाबंधाऱ्याची सर्व 85 दारे खुली करण्यात आली आहेत.
8/10

यामुळे सिरोंचा तालुक्यातील बॅक वॉटरमुळे खेडी रिकामी करण्याचे संकट टळण्याची शक्यता आहे.
9/10

प्रशासनाची नजर गोसेखुर्दच्या पाण्यावर देखील आहे.
10/10

जिल्ह्याला वळसा घालणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने परिस्थिती आणखी बिकट होत असल्याने तासातासाला याबाबत माहिती घेतली जात आहे.
Published at : 13 Jul 2022 12:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
