बीड येथील पालवण गावाजवळ असलेल्या सह्याद्री देवराईच्या दोन एकर परिसराला आग लागली होती. या भीषण आगीत शेकडो झाडं होरपळली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली? याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नसलं तरी आता आगीत होरपळलेल्या या झाडाला जीवदान देण्यासाठी वन विभागाच्या वतीनं होरपळलेल्या झाडांना टँकरच्या साह्याने पाणी देण्यात येत आहे. (ड्रोन सौजन्य : अनिल धायगुडे)
2/7
सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेतून बीड शहराजवळ सह्याद्री देवराई हा प्रकल्प साकारला आहे. ही दोन दृश्य सह्याद्री देवराईची आहेत. (ड्रोन सौजन्य : अनिल धायगुडे)
3/7
एका दृश्यांमध्ये हिरवीगार सह्याद्री देवराई पाहायला मिळतेय, तर दुसऱ्या दृश्यात आग लागल्यानंतर सह्याद्री देवराईची अवस्था अशी झाली आहे. (ड्रोन सौजन्य : अनिल धायगुडे)
4/7
सध्या या ठिकाणचे गवत वाढलेला आहे. त्यामुळे हिरवळ जरी नसली तरी आगीमुळे डोंगराचा जो भाग जळालेला आहे तू असा काळवंडून गेलाय. त्यामुळे सह्याद्री देवराईचे पूर्वीच जे नयनरम्य दृश्य होतं, ते पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (ड्रोन सौजन्य : अनिल धायगुडे)
5/7
मोठ्या प्रमाणात लागलेली ही आग वन मजुरांनी मोठ्या मेहनतीने वीजवली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला या देवराईमध्ये अनेक देशी झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. (ड्रोन सौजन्य : अनिल धायगुडे)
6/7
या ठिकाणी अनेक लोक पर्यटनासाठी येतात आणि यातूनच काही गैरप्रकार झाल्यानं ही आग लागली असावी, असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. (ड्रोन सौजन्य : अनिल धायगुडे)
7/7
होरपळलेली झाडं येत्या पंधरा दिवसांत पूर्ववत होतील आणि सह्याद्री देवराई पाहिल्यासारखी हिरवी होईल त्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे. (ड्रोन सौजन्य : अनिल धायगुडे)