दाखल झालेल्या या लसी आता आठ जिल्ह्यांना पुरवण्यात येणार आहेत. ज्याअंतर्गत एकट्या बेळगाव जिल्ह्यासाठी 37 हजार लसी आल्या आहेत. केंद्रानं आखलेल्या वेळापत्रकानुसार 16 तारखेपासून इथंही प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात होणार.
2/9
त्यामुळं खऱ्या अर्थानं लस, वाजत गाजत आली असं म्हणायला हरकत नाही. कोरोनावर मात करण्यासाठीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर सध्याच्या घडीला 1 लाख 47 हजार लसी बेळगावात आल्या आहेत.
3/9
आरती केल्यानंतर वाहनातील लसी तेथील कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात आल्या. बरं स्वागताचा हा उत्सह इतक्यावरच थांबला नाही. लस येण्याच्या आनंदात इथं बँडबाजाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
4/9
वाहनानं हद्द ओलांडताच पोलीस बंदोबस्तात लस आणणारं हे वाहन बेळगावच्या व्हॅक्सिन डेपो येथे आणण्यात आलं. तिथं सुहासिनींनी लस आणलेल्या वाहनाची आरती केली.
5/9
याच तारणहार लसीच्या येण्यानं बेळगावमध्ये लसीचं जंगी स्वागत करण्यात आलं. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सीरमच्या कोविशिल्ड लस आणणाऱ्या वाहनाने कर्नाटक हद्दीत प्रवेश केला.
6/9
लसीचं हेच महत्त्व पाहता दणक्यात झालेलं स्वागत अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित आणत आहे.
7/9
सध्या हेच सारंकाही केलं जात आहे. पण, कोणा एका व्यक्तीसाठी नव्हे, तर एका लसीसाठी. होय... लसीसाठी.
8/9
कोरोना विषाणूवर मात करण्याच्याच हेतूनं देशातील विविध भागांत दाखल झालेल्या लसींचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. कोण एक देवदूत म्हणा किंवा मग तारणहार या संकटात हाताशी आलेली ही लस म्हणजे एक मोठा दिलासाच ठरत आहे.
9/9
एखादा खास पाहुणा किंवा खास व्यक्ती घरात पहिल्यांदा प्रवेश करते त्यावेळी त्यांचं वाजतगाजत, उत्साहात किंवा मग आरती ओवाळून स्वागत केलं जातं.