एक्स्प्लोर
Raju Shetti : मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ 'स्वाभिमानी'चा कँडल मार्च; शेकडो तरुणी, महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद
Swabhimani candle march : इचलकरंजीमधील शेकडो महिलांनी कँडल मार्चमध्ये सहभागी होत संताप व्यक्त केला. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेमध्ये काम करणाऱ्या तरुणी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.

Swabhimani candle march over manipur violence led by Raju Shetti
1/10

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये मणिपूरसह देशात होत असलेल्या अत्याचाराचा निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला.
2/10

यावेळी इचलकरंजी शहरातील शेकडो महिलांनी कँडल मार्चमध्ये सहभागी होत संताप व्यक्त केला.
3/10

स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेमध्ये काम करणाऱ्या शेकडो तरुणी विद्यार्थिनी सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.
4/10

पाऊस असतानाही महिला सहभागी झाल्या.
5/10

सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास कँडल मार्चला प्रारंभ झाला.
6/10

शिवतीर्थावरून मोर्चाला प्रारंभ झाल्यानंतर मुख्य मार्गावरून महात्मा गांधी पुतळ्याजवळ आला.
7/10

यावेळी पावसाच्या सरी कोसळत असतानाही मार्च काढण्यात आला.
8/10

कँडल मार्चमध्ये प्रताप होगाडे, सदाभाऊ मलाबादे, सौरभ शेट्टी, प्रसाद कुलकर्णी, दिलीप जगोजे, अण्णासाहेब शहापुरे पद्माराणी पाटील, आदींसह शेकडो महिला आणि नागरिक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.
9/10

मणिपूरमध्ये मानवी क्रौयाची परिसीमा गाठली गेली आहे. जवानाच्या पत्नीवरही अत्याचार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यासह देशात संतापाची लाट उसळली आहे.
10/10

या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तीन दिवस अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
Published at : 27 Jul 2023 11:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion