एक्स्प्लोर
PHOTO: कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शनात 4 दिवसात 12 कोटींची उलाढाल
Bhima Agriculture Exhibition : शेतकऱ्यांच्या उत्साही प्रतिसादामुळे पुढील भीमा कृषी प्रदर्शनाची व्याप्ती वाढवणार असल्याची घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.
Bhima Agriculture Exhibition
1/12

कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शनात 4 दिवसात 12 कोटींची उलाढाल झाली. तांदळासह अन्य धान्यांची उच्चांकी विक्री झाली.
2/12

शेतकऱ्यांच्या उत्साही प्रतिसादामुळे पुढील भीमा कृषी प्रदर्शनाची व्याप्ती वाढवणार असल्याची घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.
3/12

कोल्हापुरातील मेरी वेदर मैदान येथे आयोजित भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात लाखो शेतकरी व नागरिकांनी भेट दिली. नितीन गडकरी यांनीही कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने प्रदर्शनाला भेट दिली.
4/12

महिला बचत गटांनी उभ्या केलेल्या खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून 50 लाखांची उलाढाल झाली.
5/12

शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
6/12

भीमा कृषी प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित 400 कंपन्याचा सहभाग होता. 200 महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
7/12

तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविलेला सर्वात मोठा हरियाणातील 12 कोटींचा बादशाह रेडा आणि 31 लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैस प्रदर्शनाची खास आकर्षण ठरली.
8/12

शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरीची सोय करण्यात आली होती.
9/12

भीमा कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी डॉ. जे.बी. पाटील, सहायक प्राध्यापक यांनी सेंद्रीय शेती आणि जमीनीचे अरोग्य या विषयावर व्याख्यान दिले.
10/12

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रभर जीआय मानांकित असणाऱ्या उत्पादनांचे प्रदर्शन भीमा कृषी प्रदर्शन येथे भरवण्यात आले होते.
11/12

याचबरोबर भीमा फार्म अँग्रोमधील पक्षी तर देशी आयुर्वेदिक शिवकालीन काळा ऊस, खुपिरे येथील झाडाला पिकलेली देशी सेंद्रिय केळी आकर्षण ठरली.
12/12

चार दिवसात कोल्हापूर जिल्ह्यासह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटकातून शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती.
Published at : 30 Jan 2023 04:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
बीड
महाराष्ट्र




















