एक्स्प्लोर
Kolhapur Municipal Corporation: तुंबलेला कारभार! 'उकिरडा' झालेल्या फुटपाथ स्वच्छतेसाठी कोल्हापूर मनपाला मुहूर्त सापडला, पण काढलेला कचरा फुटपाथवरच तुंबवून ठेवला
शहरातील कचरा उठावही वेळेत होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, नागरिकही मिळेल त्या मोकळ्या जागेत कचरा फेकत असल्याने शहराची स्थिती विद्रुप होत चालली आहे.
Kolhapur Municipal Corporation clean the dirty sidewalk but left the garbage piled up on the sidewalk
1/10

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार चांगलाच चर्चेत आहे.
2/10

अधिकाऱ्यांची टक्केवारी जाहीरपणे कंत्राटदारानेच दाखवून देत अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
3/10

कोल्हापूर मनपाकडून गेल्या काही दिवसांपासून प्रमुख मार्गांवरील फुटपाथ स्वच्छता आहे.
4/10

फुटपाथ स्वच्छता केल्यानंतर काढण्यात आलेला कचरा उठावही तातडीने करायला हवा होता.
5/10

मात्र, अनेक मार्गांवर फुटपाथ स्वच्छता करण्यात आली असली, तरी कचरा तसाच पडून राहिला आङे.
6/10

पावसाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी आहे. त्यामुळे कचऱ्याचा ढीग तसाच पडून आहे.
7/10

अन्यथा तोच कचरा फुटपाथवरील पाण्याने रस्त्यावर वाहून आला असा हे नव्याने सांगण्याची गरज नाही
8/10

महावीर महाविद्यालयपासून ते सेंट झेवियर्स हायस्कुल मार्गावर फुटपाथ स्वच्छता करण्यात आली, पण कचरा अजूनही पडून आहे.
9/10

पोलिस अधीक्षक कार्यालयापासून ते कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय मार्गावरील फुटपाथ स्वच्छता करण्यात आली, पण त्यामार्गावरील कचरा सुद्धा तसाच पडून आहे.
10/10

शहरातील कचरा उठावही वेळेत होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, नागरिकही मिळेल त्या मोकळ्या जागेत कचरा फेकत असल्याने शहराची स्थिती विद्रुप होत चालली आहे.
Published at : 07 Aug 2025 04:21 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























