एक्स्प्लोर
Vande Bharat Sleeper : वंदे भारत स्लीपर ट्रेनचा 'फर्स्ट लूक', वेगवान प्रवास आता आणखी आरामदायी होणार
Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास आणी सुखकर होणार आहे. लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Vande Bharat Sleeper Train
1/11

वंदे भारत लवकरच स्लीपर ट्रेनच्या प्रकारात प्रवाशांसमोर येणार आहे. त्यामुळ वंदे भारतचा वेगान प्रवास आता आणखी आरामशीर होईल.
2/11

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनची झलक दाखवणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केलं आहेत.
3/11

रेल्वे मंत्र्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट लूक आणि आतमधील डिझाईन दाखवणारे फोटो शेअर केले आहेत.
4/11

वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
5/11

इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) आणि भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) द्वारे वंदे भारत स्लीपर कोच संयुक्तपणे तयार केले जात आहेत.
6/11

स्वदेशी सेमी-हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या कोच मॉडेलचे फोटो शेअर करताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, वंदे भारत एक्स्प्रेसची स्लीपर आवृत्ती 2024 च्या सुरुवातीला लाँच केली जाईल.
7/11

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या आतमधील फोटो आलिशान वाटेल. या गाड्यांमधला प्रवास एखाद्या लक्झरी हॉटेलसारखा असेल.
8/11

वंदे भारत स्लीपर ट्रेन आधुनिक सुविधांसह तयार करण्यात येत आहे. त्याची रचना आधुनिक असून प्रवाशांची सोय लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
9/11

त्यामुळे प्रवाशांना वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून अतिशय आरामदायी आणि सुखकर प्रवास करता येईल.
10/11

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या फोटो ट्रेनच्या आतील अत्याधुनिक सुविधांचा किती आरामदायी असतील याचा अनुभव मिळेल.
11/11

स्लीपर कोचमध्ये अधिक आरामदायक आसनांसह क्लासिक लाकडी डिझाइन आहे. डब्यांमध्ये फ्लोअर लाइटनिंग आणि उत्तम प्रकाश व्यवस्था असेल.
Published at : 04 Oct 2023 02:36 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
मुंबई
नाशिक


















