एक्स्प्लोर
Uttarakhand Tunnel Collapse : दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून बोगद्यात अडकले 41 मजूर, बचावकार्य युद्धपातळीवर; 25 मीटर ड्रिलिंग बाकी
Uttarakhand Tunnel Accident : उत्तरकाशीमधील सिल्क्यारामध्ये बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
Uttarakhand Uttarkashi Tunnel Rescue Operation
1/11

सिल्क्यारा बोगद्यात 25 मीटर ड्रिलिंग बाकी आहे. 60 ते 70 मीटर लांबीचे पाइप टाकले जाणार असून NDRF टीम आत जाऊन कामगारांची सुटका करेल.
2/11

प्रशासनाकडून मजुरांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. उत्तरकाशीत बोगद्यात मजुर अडकल्याने संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला आहे.
3/11

उत्तराखंडच्या उत्तरकाशीच्या सिल्कयारा बोगद्यात अडकलेले ४१ मजूर लवकरच बाहेर येण्याची अपेक्षा आहे.
4/11

अमेरिकन ऑगर मशीनने बोगद्याच्या प्रवेशापासून सुमारे 40 मीटरपर्यंत 800 मिमी पाईप ड्रिल करण्यात आले आहे.
5/11

आता सुमारे 25-30 मीटर ड्रिलिंग बाकी आहे. आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या ड्रिलिंग पूर्ण होण्याची शक्यता आहे.
6/11

41 मजूर गेल्या 11 दिवसांपासून बोगद्यामध्ये अडकलेले आहेत. मजुरांना चारही बाजूंनी दगड-मातीचा वेढा आहे.
7/11

11 दिवस मजुरांची झुंज सुरु आहे. मजुरांना अन्न, पाणी आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरु आहे.
8/11

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बोगद्याचं काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला आणि हे सगळे मजूर आतच अडकले.
9/11

बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे.
10/11

मजुरांसोबत वॉकी-टॉकीने संवाद साधला जात असून वेळोवेळी आतील परिस्थितीची माहिती घेतली जात आहे.
11/11

पाईपलाईनद्वारे मजुरांना ऑक्सिजन, पाणी आणि अन्न पुरवलं जात आहे.
Published at : 22 Nov 2023 12:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















