एक्स्प्लोर
पोस्टाच्या या योजनांमधून मिळेल अधिक फायदा, करमुक्तीचा देखील मिळेल लाभ
Post Office Scheme: रेपो दरात वाढ झाल्यामुळे अनेक बँकांनी आपल्या एफडीच्या व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. परंतु यानंतरही पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये अधिक व्याजदर मिळत आहे.

Investment
1/9

तसं पाहायला गेलं तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय सध्या उपलब्ध आहेत. परंतु बरेच लोक रिस्क फ्रि योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात. त्यामुळे पोस्टच्या योजना हा गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं जातं.
2/9

पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्या बँकांच्या एफडीवरील व्याजदरांपेक्षा अधिक व्याजदर देतात. तसेच या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला करमुक्तीचा देखील लाभ मिळेल.
3/9

जर तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी देखील गुंतवणूक करु शकता. त्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा पर्याय निवडू शकता.
4/9

यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्तीची सवलत मिळू शकते. तसेच तुम्हाला या योजनेमध्ये आठ टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळू शकते.
5/9

तसेच पोस्टाच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.7 टक्के व्याजदर मिळेल.
6/9

तसेच तुम्हाला या खात्यामध्ये जमा असलेल्या एकूण रकमेच्या 1.5 लाखापर्यंत वर्षाला करमुक्तीची सवलत मिळेल.
7/9

पोस्टाच्या जेष्ठ नागरिकांच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास 8.2 टक्क्याने व्याजदर मिळेल.
8/9

तसेच टाइम डिपॉजिट या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला पाच वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदर मिळेल.
9/9

जर एसबीआय बँकेच्या मुदत ठेव योजना पाहिली तर पाच वर्षांसाठी सामान्य नागरिकांना 6.50 टक्के व्याजदर मिळेल. तर जेष्ठ नागरिकांना 7.50टक्के व्याजदर मिळेल.
Published at : 27 May 2023 12:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
