ईशान्य मोसमी पावसामुळं दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यात पाऊस पडत असल्यामुळं शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
2/9
तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आणि केरळमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. या राज्यांमध्ये दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
3/9
सात नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुचुदेरी, कराईकल, केरळमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
4/9
उत्तर भारतातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. या राज्यात पाच ते सात नोव्हेंबरदरम्यान पावासाचा अंदाज आहे.
5/9
उत्तराखंडमध्ये सहा आणि सात नोव्हेंबरला बर्फवृष्टीसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं तिथे वातावरणात गारवा जाणवत आहे.
6/9
पावसामुळं तामिळनाडूमधील, कांचीपुरम जिल्ह्यातील तंजावर, तिरुवरूर मायिलादुथुराई, नागापट्टिनम, कुंद्रथूर इथे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
7/9
चेन्नईतील महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये आठ नोव्हेंबरपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
8/9
महाराष्ट्रात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात गारठा वाढला आहे.
9/9
दक्षिण भारतात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.