एक्स्प्लोर
कधी व्हाईट टी-शर्ट, तर कधी दाढी अन् आता...; तीन वर्षांत असे बदलले राहुल गांधींचे लूक
Rahul Gandhi News Look: काँग्रेस नेते राहुल गांधी सात दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. पण या व्याख्यानापूर्वी राहुल गांधींचा एक फोटो समोर आला आहे.
![Rahul Gandhi News Look: काँग्रेस नेते राहुल गांधी सात दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. पण या व्याख्यानापूर्वी राहुल गांधींचा एक फोटो समोर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/c30d74533d704047f9a7c3b061acd6ed167765417276488_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rahul Gandhi News Look Goes Viral on Social Media
1/9
![काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नवा लूक समोर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/b718dc4d5e03c8bccb692a6d24f25b2805963.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नवा लूक समोर आला आहे.
2/9
![राहुल सध्या यूके दौऱ्यावर आहेत. तिथे ते केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/b80e746eb9e0c7f0ca664712f87d56f95f963.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल सध्या यूके दौऱ्यावर आहेत. तिथे ते केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणार आहेत.
3/9
![राहुल गांधीच्या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. फोटोमध्ये राहुल गांधींनी संपूर्ण लूक चेंज केल्याचं पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/fe705d0cc58eeeac8903bc7678226ab8c653e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधीच्या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. फोटोमध्ये राहुल गांधींनी संपूर्ण लूक चेंज केल्याचं पाहायला मिळत आहे.
4/9
![भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) राहुल गांधींच्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. यावरुन विरोधकांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला होता. कधी कडाक्याच्या थंडीतील त्यांचा व्हाईट टी-शर्ट लूक, तर कधी त्यांची पांढरी दाढी चर्चेत राहिली आहे. अशातच सध्या राहुल गांधींचा जेंटलमन लूक चर्चेचा विषय ठरत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/0b6af183b37118b79eb4813a95b00dec8529f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) राहुल गांधींच्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. यावरुन विरोधकांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला होता. कधी कडाक्याच्या थंडीतील त्यांचा व्हाईट टी-शर्ट लूक, तर कधी त्यांची पांढरी दाढी चर्चेत राहिली आहे. अशातच सध्या राहुल गांधींचा जेंटलमन लूक चर्चेचा विषय ठरत आहे.
5/9
![या फोटोंमध्ये राहुल गांधी सुटाबुटात दिसत असून त्यांनी दाढी ट्रिम केल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, कोट-टायमधील राहुल गांधींचा जेंटलमन लूक राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/6eac3679c04c435357a6f14def49552c27a82.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये राहुल गांधी सुटाबुटात दिसत असून त्यांनी दाढी ट्रिम केल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, कोट-टायमधील राहुल गांधींचा जेंटलमन लूक राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनला आहे.
6/9
![राहुल गांधींच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात तब्बल 3570 किलोमीटरचा प्रवास राहुल गांधींनी केला. या प्रवासादरम्यान राहुल गांधींचा पांढऱ्या टी-शर्टमधील लूक विशेष चर्चेचा विषय बनला होता. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी दाढीही खूप वाढवली होती. आता राहुल गांधी ब्रिटनमध्ये नव्या रुपात दिसून आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/b597c4cca10de50dc965ff13e267d2582cae3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधींच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात तब्बल 3570 किलोमीटरचा प्रवास राहुल गांधींनी केला. या प्रवासादरम्यान राहुल गांधींचा पांढऱ्या टी-शर्टमधील लूक विशेष चर्चेचा विषय बनला होता. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी दाढीही खूप वाढवली होती. आता राहुल गांधी ब्रिटनमध्ये नव्या रुपात दिसून आले आहेत.
7/9
![भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधींचा लूक पाहुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर काहींनी त्यांना साधू-संत म्हणून संबोधलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/cc2d0d7a6d4635fe7b6ea53be7bf699085508.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधींचा लूक पाहुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर काहींनी त्यांना साधू-संत म्हणून संबोधलं होतं.
8/9
![भारत जोडो यात्रा आणि सध्याच्या लूक व्यतिरिक्त राहुल गांधी यांच्या त्यापूर्वीच्या लूकचीही जोरदार चर्चा रंगली आहे. (PC : www.oneindia.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/186776354589478ad2926ddc5e53ebbb86c70.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत जोडो यात्रा आणि सध्याच्या लूक व्यतिरिक्त राहुल गांधी यांच्या त्यापूर्वीच्या लूकचीही जोरदार चर्चा रंगली आहे. (PC : www.oneindia.com)
9/9
![राहुल गांधी 7 दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात केंब्रिज विद्यापीठातील व्याख्यानाने होणार आहे. केंब्रिज बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी राहुल गांधी 'लर्निंग टू लिसन इन द 21वी सेंच्युरी' या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित करतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/e40b883fd9eae861ac2e792161d6d8576a1ee.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी 7 दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात केंब्रिज विद्यापीठातील व्याख्यानाने होणार आहे. केंब्रिज बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी राहुल गांधी 'लर्निंग टू लिसन इन द 21वी सेंच्युरी' या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित करतील.
Published at : 01 Mar 2023 01:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)