एक्स्प्लोर
Kutch Tourism: गुजरातला जात असाल तर कच्छचे रण नक्की पाहा; मनाला भुरळ घालतील 'हे' फोटो
Rann of Kutch: एकेकाळी भूकंपाने उद्ध्वस्त झालेला कच्छ आज पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. गुजरात राज्यात हा प्रदेश आहे, या ठिकाणाचे काही सुंदर फोटो पाहूया.
Kutch Rann
1/10

कच्छचे रण भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात आहे. कच्छचे रण गांधीधामपासून 108 किलोमीटर अंतरावर आहे.
2/10

कच्छचे रण हा एक खारट दलदलीचा, मिठाने आच्छादलेला भाग आहे.
3/10

कच्छचा वारसा आणि संस्कृती देशात आणि जगभरात पोहोचावा म्हणून गुजरात पर्यटन विभागाने 'रण उत्सव' देखील सुूरू केला आहे.
4/10

येथे रण उत्सव नोव्हेंबर ते मार्चपर्यंत चालू राहतो.
5/10

पर्यटकांची उत्तम निवड म्हणून कच्छला प्रसिद्धी मिळाली.
6/10

कच्छच्या रणात उंट आणि घोड्यांच्या पाठीला रंगीबेरंगी कपड्यांनी सजवलं जातं. जेणेकरुन पर्यटकांना आरामदायी आणि शाही सवारीचा अनुभव मिळावा.
7/10

चांदण्या रात्री या ठिकाणचं सौंदर्य बघण्यासारखं असतं.
8/10

पौर्णिमेच्या रात्री येथील मिठाची जमीन अशी चमकते, जणू पृथ्वीवर लखलखीत तारे पसरले आहेत.
9/10

कच्छचे रण दिवसा पूर्णपणे पांढरे दिसते, जणू पृथ्वी आणि आकाश एकत्र झाले आहेत.
10/10

मोकळे आकाश, थंड वारा आणि मोठं रण हे सर्व मिळून या ठिकाणाचं सौंदर्य स्वर्गासारखं बनवतात.
Published at : 11 Sep 2023 01:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























