एक्स्प्लोर
Pocket ventilator | खिश्यात मावणारं 'पॉकेट व्हेंटिलेटर'! कोलकात्याच्या संशोधकाची कमाल
फोटो सौजन्य : Abhijit Roy फेसबुक
1/7

कोलकातामधील शास्त्रज्ञाने “पॉकेट व्हेंटिलेटर” विकसित केले आहे. जे सध्याच्या कोविड महामारीत नवसंजीवनी ठरु शकते. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी यांनी हे व्हेंटिलेटर तयार केले असून ते व्यवसायाने अभियंता आहेत. (फोटो सौजन्य : Abhijit Roy फेसबुक)
2/7

इनोव्हेटिव वस्तू विकसीत करण्याचं पॅशन असलेल्या डॉ. रामेंद्र यांनी पोर्टेबल, बॅटरीवर चालणारे पॉकेट-आकाराचे व्हेंटिलेटर तयार केले आहे. जे श्वासोच्छवासाचा त्रास असणाऱ्या रूग्णांना त्वरित आधार देऊ शकेल. हे व्हेंटिलेटर अगदी स्वस्त असून रुग्णालयात वापरल्या जाणार्या अवजड सीपीएपी (continuous positive airway pressure) उपकरणाचा एक प्रभावी पर्याय असू शकतो. (फोटो सौजन्य : Abhijit Roy फेसबुक)
3/7

मुखर्जी यांनी सांगितले की मला कोविड संसर्ग झाल्यानंतर माझी ऑक्सिजन पातळी खूप खाली गेली होती. तेव्हा अशा डिव्हाइसची कल्पना माझ्या मनात आली. माझी SpO2 लेव्हल 88 पर्यंत खाली आली. त्यावेळी माझ्या कुटुंबियांनी मला रुग्णालयात दाखल करावे, अशी इच्छा होती. मी या संकटातून बाहेर आलो असलो तरी रुग्णांना सहज श्वास घेण्यास मदत करण्यासाठी पोर्टेबल डिव्हाइसच्या कल्पनेने मला स्वस्त बसू दिले नाही. त्यानंतरच मी हे डिव्हाईसवर काम करण्यास सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. (फोटो सौजन्य : Abhijit Roy फेसबुक)
4/7

कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांनी या योजनेवर काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था करत पॉकेट व्हेंटिलेटरने आपल्या नवीन नाविन्यास आकार दिला. ते म्हणाले पॉकेट व्हेंटिलेटर फक्त 20 दिवसात तयार झाला आहे. (फोटो सौजन्य : Abhijit Roy फेसबुक)
5/7

या डिव्हाइसचे दोन भाग आहेत - माउथपीससह एक पॉवर युनिट आणि व्हेंटिलेटर युनिट. हे एकदा चालू केल्यानंतर व्हेंटिलेटर बाहेरून हवा आता घेते आणि व्हायरस आणि जंतूपासून शुद्ध करणारे अल्ट्रा-व्हायलेट (यूव्ही) चेंबरमधून जाते. यानंतर ते डिव्हाइसवर चिकटलेल्या माउथपीसमधून वाहते, ज्यामुळे श्वसन प्रणालीमध्ये वायुप्रवाह वाढतो. त्याचप्रमाणे, जेव्हा युजर कार्बन डायऑक्साईड सोडत असेल तेव्हा ते सोडण्यात येण्यापूर्वी दुसर्या अतिनील चेंबरमधून बाहेर टाकली जाते. (फोटो सौजन्य : Abhijit Roy फेसबुक)
6/7

एखाद्या व्यक्तीस कोविडचा संसर्ग झाला असला तरीही, अतिनील फिल्टर श्वासोच्छ्वास सोडल्यानंतर डिव्हाइसमधून हवा सोडण्यापूर्वी व्हायरस नष्ट करतो. यामुळे विषाणूचे संक्रमित प्रमाण कमी होईल आणि डॉक्टरांना अधिक सुरक्षित वाटेल, ”असे मुखर्जी पुढे म्हणाले. (फोटो सौजन्य : Abhijit Roy फेसबुक)
7/7

काळी बुरशीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली असताना हे उपकरण सुरक्षित पर्याय ठरू शकते, असा दावा डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी यांनी केला आहे. (फोटो सौजन्य : Abhijit Roy फेसबुक)
Published at : 12 Jun 2021 08:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई


















