एक्स्प्लोर
International Day of Yoga 2023 : योगा विथ मोदी...
Yoga with Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योगासनांचे चित्रण असलेले 16 व्हिडीओ शेअर केले आहेत.
Yoga with Modi
1/16

वृक्षासन : योगासनाचा एक प्रकार. वृक्ष म्हणजे झाड. झाडाला एकच बुंधा असतो. ज्याप्रमाणे वृक्ष एकाच खोडावर उभा असतो तसे या आसनात एका पायावर उभे रहावयाचे असते व एकूणच शरीराचा आकार वृक्षासारखा भासतो म्हणून या आसनाला वृक्षासन हे नाव प्राप्त झाले. हे आसन करावयास सोपे आहे. ते मज्जासंस्थेवर तत्काळ परिणाम करते त्यामुळे मनाला स्थिरता येते. शास्त्रीय नृत्य करणाऱ्यांसाठी हे आसन फारच उपयोगी आहे.
2/16

ध्यान : ‘ध्यान’ म्हणजे चिंतन. ध्यान शब्द संस्कृत भाषेतील ‘ध्यै’ या धातूपासून (धातु = क्रियापदाचे मूळ रूप) निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ ‘चिंतन करणे’ असा आहे. ज्या एखाद्या देशावर म्हणजे वस्तूवर अथवा वस्तूंच्या संघातावर जसे पान, फुल, खोड हे अवयव या एकेका वस्तूवर किंवा त्यांचा संघात म्हणजे वृक्षावर ध्यान करता येईल.
Published at : 17 Jun 2023 10:44 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
महाराष्ट्र
























